rahul gandhi

राहुल गांधींचा पुतळा 'उलेमा'नं जाळला

उलेमा कौन्सिलच्या कार्यकर्त्यांसह काही तरुणांनी आज गुरुवारी येथील शिबिली नॅशनल महाविद्यालयासमोर आंदोलन करत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध केला. बाटला हाऊस जामियानगर येथील पोलीस चकमकीच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे तरूणांनी आंदोलन केले.

Jan 12, 2012, 05:44 PM IST

उ. प्रदेशमध्ये राजकीय वारसदारांचे भवितव्य पणाला

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुका अनेक राजकीय घराण्यांच्या वारसदारांसाठी सत्वपरिक्षा घेणारा ठरेल. काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी आणि त्यांचे चुलत भाऊ भाजपाचे वरुण गांधी यांच्यासाठी ही कठिण परिक्षा असेल. या व्यतिरिक्त समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांचे चिरंजीव अखिलेख यादव तसंच अजित सिंग यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांचीही कसोटी लागणार आहे.

Jan 1, 2012, 06:28 PM IST

राहुलचा हा प्रांतवाद- उद्धव

[jwplayer mediaid="7088"]

Dec 20, 2011, 05:08 PM IST

राहुल बोले, सरकार चाले- अण्णा

कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेतून वगळल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वगळण्याचा निर्णय हा काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानांनी घेतल्याचाही आरोप अण्णांनी यावेळी केला.

Dec 2, 2011, 01:54 PM IST

दिल्लीतील भिकारीपण यूपीचेच- राहुल

कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसात वक्तव्य करून चर्चेत राहायचं असंच ठरवले आहे्. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबद्दल केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं आहे. कारण की, त्यानंतर सगळ्या स्थरातून त्यांचावर टीका होत होती,

Nov 23, 2011, 12:09 PM IST

काँग्रेसच्या युवराजांचे भावनिक आवाहन

काँग्रेसचे महासचिव राहुल यांनी उत्तर प्रदेशाचा कायापालट करुन येत्या पाच वर्षात देशातलं क्रमांक एकच राज्य बनवू असं आश्वासन दिलं. बाराबंकी इथे प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना राहुल गांधी म्हणाले की मी तुम्हाला खात्री देतो की पाच वर्षात उत्तर प्रदेश उद्योग, व्यावसाय आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत क्रमांक एकच राज्य बनेल.

Nov 22, 2011, 03:18 PM IST

राहुल गांधीविरोधात बदनामीची तक्रार

काँगेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात फारुख घोसी यांनी वांदे न्यायदंडाधिकाऱ्यांकडे बदनामीची तक्रार नोंदवली.

Nov 16, 2011, 06:40 AM IST

राहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज

उत्तर प्रदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Nov 15, 2011, 09:08 AM IST

राहुल गांधींना समज कमी – राज

राहुल गांधी यांना मुळात समज कमी असून त्यांना सल्ला कोण देतं हे मला माहिती नाही. या गांधी घराण्याने उत्तरप्रदेश आणि देशाची सत्ता उपभोगली, त्यांच्यामुळेच उत्तर प्रदेशातील लोकांना भीक मागायची वेळ आली, असल्याचा दणदणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.

Nov 14, 2011, 04:02 PM IST

गडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांना आता भजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी १लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कलावतींनी ही मदत नाकारलीय.

Nov 10, 2011, 06:26 AM IST

राहुल, अडवाणी, मोदी दहशतवाद्यांचे 'टार्गेट'

काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.

Nov 3, 2011, 08:24 AM IST

राहुल गांधींकडे कार्यकारी अध्यक्षपद?

काँग्रेसचे रचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद सोपविले जाण्याची शक्यता अधिक आहे. तशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय पटलावर सुरु आहे.

Nov 3, 2011, 06:07 AM IST

राहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न

राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कमतरता असल्याचं आणखी एकदा दिसून आलं. कारण, त्यांच्या अमेठीतल्या सभेवेळी एका पिस्तुलधारी युवकाला अटक करण्यात आली. प्रदीप सोनी असं या युवकाचं नाव आहे. यामुळे राहुलच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Oct 20, 2011, 01:11 PM IST