राहुल आज मुंबईत, घेणार झाडाझडती
काँग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटी दरम्यान राहूल गांधी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
Apr 27, 2012, 08:49 AM ISTराहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार....
काँग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी २७ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटी दरम्यान राहूल गांधी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपालिका निवणुकांच्या निकालांचा आढावा ते घेणार आहेत.
Apr 24, 2012, 04:31 PM ISTयूपी पराभवानंतर काँग्रेसचे युवराज भडकले
उत्तर प्रदेशातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सरचिटणीस राहुल गांधी अधिक आक्रमक झाले आहेत. आम्हाल केवळ हवेत चालणारे नेते नकोत, जनाधार असणारे हवेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
Apr 6, 2012, 05:49 PM ISTनरेंद्र मोदींचा 'टाईम' येणार आहे
टाईम या प्रतिष्ठित मासिकाने आपल्या आशियाई आवृत्तीत मोदींवर कव्हर स्टोरी केली आहे.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधींनी आव्हान देऊ शकतात असं टाईम मासिकाने म्हटलं आहे. नुकत्याच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर मोदी येत्या संसदेच्या निवडणुकीत राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात असं टाईमने म्हटलं आहे.
Mar 18, 2012, 09:39 AM ISTयुपीएच्या मानगुटीवर युपीचं भूत..
भलतचं धाडस राहुलबाबांच्या अंगाशी आलं आणि युपीत काँग्रेसला तोंडघशी पडावं लागलं. गरिबांचा कळवळा असल्याचं दाखवणा-या राहुलबाबांना युपीतल्या जनतेनं नाकारलं उलटं टॅब्लेटची स्वप्न दाखवणा-या आणि शेतक-यांना सोबत घेणारा अखिलेश त्यांना जवळचा वाटला. पण अपयशाची जबाबदारी स्विकारणा-या राहुल बाबांचा उदोउदो करणा-यांना वेळीच लगाम घालून चुकांमधून शिकणं काँग्रेससाठी अत्यावश्यक आहे नाहीतर मग युपी पॅटर्नची पुनरावृत्ती होणार आहे.
Mar 7, 2012, 10:31 PM ISTCMपदासाठी यादव पिता-पुत्राचे ‘पहले आप’!
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणा-या समाजवादी पक्षाची बैठक सुरू झालीय़. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. तरूण नेते आणि मुलाय़मसिंग यांचे पुत्र अखिलेश यादव हेच उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Mar 7, 2012, 09:33 PM ISTउत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर उगवता तारा
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या घमासान लढाईत समाजवादी पक्षाने बहुमत प्राप्त केलं. यावेळेस काँग्रेसच्या सर्व राहुल गांधींवर पक्षाची भिस्त होती तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत होता. राहुल गांधींनी तब्बल २०० प्रचार सभा घेतल्या पण पदरी निराशाच आली. उत्तर प्रदेश सारख्या क्षेत्रफळाने अवाढ्य असलेल्या राज्यात मृतप्राय असलेल्या काँग्रेसला संजीवनी देणं हे तितकसं सोपं नाही.
Mar 7, 2012, 12:09 PM ISTगुन्हा केला राहुल गांधींनी?
यूपीमध्ये आचारसंहिता दरम्याना राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना युपीमध्ये वेग आला आहे.
Feb 21, 2012, 12:24 PM ISTराहुल गांधींविरूद्ध गुन्हा दाखल
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविरोधात प्राथमिक तपास अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. यामुळे कानपूरमधील त्यांचा रोड शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Feb 21, 2012, 08:05 AM ISTउत्तर प्रदेश निवडणुका अन् शाहरुखचे कनेक्शन
उत्तर प्रदेशच्या निवडणुका, शाहरुख खान, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री मायावती यांचे कनेक्शन काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल.
Feb 7, 2012, 12:53 PM ISTरॉबर्ट वढेरांचे राजकारण प्रवेशाचे संकेत
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयी संकेत दिले आहेत. प्रियांका गांधींचे पती असलेल्या रॉबर्ट वढेरा यांनी सध्या राजकारणात राहुल गांधींची वेळ आहे पण जनतेने आग्रह केल्यास सक्रिय राजकारणात उतरु असं म्हटलं आहे.
Feb 6, 2012, 04:10 PM ISTउत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचार समाप्ती
राजकीय दृष्ट्य सर्वात महत्वाच्या उत्तर प्रदेशात विधानसभे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता आज संध्याकाळी प्रचार समाप्ती होणार आहे.
Feb 6, 2012, 11:29 AM ISTराहुल गांधीनी माफी मागावी - उमा भारती
राहुल गांधी यांनी जे काही शब्द वापरले आहेत, त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुख उमा भारती यांनी केली आहे.
Jan 21, 2012, 03:27 PM ISTप्रियांका राजकारणात सक्रीय
काँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
Jan 17, 2012, 03:34 PM ISTमुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.
Jan 14, 2012, 04:26 PM IST