ransangram

ईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

Feb 24, 2017, 06:48 PM IST

ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

Feb 24, 2017, 04:44 PM IST

राज्यात पाहा कोणाची कामगिरी सरस, कोण बॅकफूटवर?

भाजप महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये नंबर एकचा पक्ष झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला झाले आहे. 

Feb 24, 2017, 04:29 PM IST

नाशिक महापालिकेत ७९ वर्षांच्या नगरसेविका

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.

Feb 24, 2017, 03:40 PM IST

दोघांची घरवापसी, शिवसेनेची पालिकेतील संख्या 86

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेला पक्षात बाहेर गेलेल्यांची पुन्हा साथ मिळत आहे. त्यांची घरवापसी होत आहे. आता आणखी एक प्रभाग - 41चे अपक्ष शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे शिवसेनेची संख्या 86 वर पोहोचली आहे.

Feb 24, 2017, 02:17 PM IST

नवख्या तरुण उमेदवारांने अनुभवी दोन नगरसेवकांना दिला दणका

मुंबई महापालिकेत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कुर्ला विभागातून प्रभाग क्रमांक 160 अपक्ष किरण लांडगे या तरुण उमेवाराचा विजय झाला आहे. 

Feb 24, 2017, 01:22 PM IST

बंडखोर उमेदवाराची घरवापसी, मुंबई पालिकेत शिवसेनेची एक जागा वाढणार

महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेल्या स्नेहल मोरे आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

Feb 24, 2017, 12:05 PM IST

राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक निकाल आकडेवारी

 भाजपनं महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलीय. मुंबईत भाजपनं स्वबळावर तिपटीनं जागा मिळवल्या असून पुणे, पिपंरी-चिंचवड, नागपूर, सोलापूर, अमरावती आणि अकोल्यात स्वबळावर सत्ता मिळवलीय. तर नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला आहे. ठाण्यात शिवसेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. मुंबईत शिवसेना नंबर वन असला तरी सत्ता स्थापन करताना कसरत करावी लागणार आहे. 

Feb 24, 2017, 11:53 AM IST

मुंबई महापालिकेतील अमराठी नगरसेवकांची संख्या ७३वर

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला जरी बहुमत मिळाले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढलीये. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झालीये.

Feb 24, 2017, 11:32 AM IST

मुंबई पालिकेत कसे जमणार सत्ता समीकरण?

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागला. पण भाजप-शिवसेनेतलं महाभारत अजून संपलेले नाही.  

Feb 24, 2017, 11:03 AM IST

निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा पराभव

ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही. 

Feb 24, 2017, 11:01 AM IST