result

दहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी

आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.

Jun 13, 2017, 11:34 AM IST

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

Jun 13, 2017, 10:22 AM IST

या वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल

दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.

Jun 12, 2017, 05:11 PM IST

दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार!

दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे. 

Jun 12, 2017, 05:00 PM IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.  

Jun 8, 2017, 08:15 AM IST

दहावीच्या निकालाला ९ जूननंतरच मुहूर्त

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९ जूननंतरच जाहीर होण्याची शक्यता असल्याचे मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय.

Jun 7, 2017, 08:14 AM IST

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई)कडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थी Cbseresults.nic.in अथवा Cbse.nic.in या साईटवर आपला निकाल पाहू शकतात.

Jun 3, 2017, 06:12 PM IST

बिहारच्या यंदाच्या टॉपरलाही अटक, बोर्डानं रद्द केला निकाल

बिहारच्या बारावीच्या बोर्डाचा टॉपर गणेश कुमार याला शुक्रवारी अटक करण्यात आली. एएनआयच्या रिपोर्टनुसार, बिहार स्कूल परीक्षा बोर्डानं (बीएसईबी) गणेश कुमारच्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय. 

Jun 3, 2017, 09:48 AM IST

औरंगाबाद बोर्डाकडून बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

 सामान्य गणित विषय निवडला असतानाही विज्ञान शाखेची परीक्षा दिल्यानं या विद्यार्थ्यांचे हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. 

May 31, 2017, 12:28 PM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST