मुंबई : आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
दहावीच्या परीक्षेचा एकूण 91.46 टक्के मुली तर 86.51 टक्के मुले पास झाले आहेत. २४ जूनला शाळेत रिझल्ट मिळणार आहे. दुपारी ३ वाजता शाळेत विद्यार्थ्यांना ती दिली जाणार आहेत. अउतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. १८ जुलैला ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.