samajwadi party

लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

Sep 3, 2015, 01:42 PM IST

मी नसतो तर आज बच्चन कुटुंबच तुरुंगात असतं - अमर सिंह

एकेकाळी स्वत:ला अमिताभ बच्चन यांचा भाऊ म्हणवून घेणारे अमर सिंह सध्या बच्चन कुटुंबीयांशी खूपच नाराज आहेत. आज आपण नसतो तर संपूर्ण बच्चन कुटुंबीय तुरुंगात असतं, असंही अमर सिंह यांनी म्हटलंय. 

May 21, 2015, 03:40 PM IST

'एक दिवसाचा पगार लोकसभेने नेपाळला द्यावा'

लोकसभेमधील सदस्यांनी आपला एक दिवसाचा पगार नेपाळसाठी द्यावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी आज केले.  नेपाळमध्ये घडलेल्या भीषण भूकंपाच्या घटनेसंदर्भात मुलायम सिंह यादव बोलत होते.

Apr 27, 2015, 08:19 PM IST

उन्नावच्या पोलीस लाईन परिसरात आढळले मानवी सांगाडे

 उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे आढळून आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. 

Jan 30, 2015, 05:50 PM IST

... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी

उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.

May 2, 2014, 01:21 PM IST

`कारगिलचा विजय हिंदू नाही तर मुस्लिम सैनिकांमुळे`

बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.

Apr 9, 2014, 08:12 AM IST

मायावती - `बहेनजी`नाही व्हायचंय पंतप्रधान?

लोकसभा निवडणूक २०१४मध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. सध्या मायावती राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मुलायम सिंह यादव आणि अरविंद केजरीवाल या आपल्या विरोधकांपेक्षा कमी दिसतायेत आणि त्या प्रचार रॅलीही कमी करतायेत. मात्र निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची रणणिती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलीय.

Apr 4, 2014, 02:19 PM IST

मुलायम सिंह यादव: किंग किंवा किंगमेकर?

मुलायम सिंह यादव यांचं उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणात मोठं नाव आहे आणि त्यांचा राजकारणातील अनुभवही तगडा आहे. राज्यातील राजकारणात सर्व काही मिळवल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर सोपवली आणि आता ते स्वत:ला देशाच्या राजकारणात झोकून दिलंय. आता त्यांची नजर आहे ती आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीवर...

Apr 4, 2014, 01:33 PM IST

राजू श्रीवास्तवने समाजवादी पार्टीचे तिकिट केले परत

हास्य कलाकार राजू श्रीवास्तव याने लोकसभा निवडणुकीचे समाजवादी पार्टीनं दिलेलं तिकीट परत केलेय. कानपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजू विरोधात असहकार पुकारल्याने तो नाराज होता. त्यामुळे हे तिकिट परत केल्याचे राजू यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 11, 2014, 05:47 PM IST

तिसऱ्या आघाडीचं समीकरण - ११ पक्ष एकत्र आले

आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी ११ पक्ष एकत्र आले आहेत. संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. नव्या गटातील पक्ष धर्म निरपेक्ष, जनतेचं कल्याण, या मुद्यावर एकत्र आलेले आहेत.

Feb 5, 2014, 07:10 PM IST

<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b> उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण</b>

उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी दिसून आलीय. इथं पोलिसांनी मागं पुढं न पाहता थेट महिलांना अमानुष मारहाण केलीय.

Jan 14, 2014, 01:56 PM IST

अखिलेश सरकारचा 'सैफई महोत्सवा'त ३०० कोटींचा चुराडा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला आजचा कार्यक्रम अचानक बदलून देढ इश्किया या आज प्रदर्शीत होणा-या हिंदी चित्रपटाच्या प्रीमियर शोला दांडी मारली. मुजफ्फरनगर आणि शामली येथील छावणीतील दंगलग्रस्तांच्या मूलभूत गरजाही मदतकार्यातून भगवल्या जात नाहीत तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं सैफई महोत्सवात तब्बल ३०० कोटींचा चुराडा केल्यानं अखीलेश यादव सरकार वादाच्या भोव-यात सापडलंय.

Jan 10, 2014, 09:36 PM IST

मुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावर घरसले

एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.

Jan 10, 2014, 05:10 PM IST

अहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा

सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.

Jan 10, 2014, 12:17 PM IST