मुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावर घरसले

एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 10, 2014, 05:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,लखनऊ
एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.
या महोत्सवात सकाळी आठ वाजल्यापासूनच मोठ-मोठ्या राजकीय हस्तींनी हजेरी लावली.. त्यांच्या दिमतीला वेटर्सचा मोठा फौजफाटाच तैनात करण्यात आला होता. ज्या वेळी ही नेते मंडळी नृत्यांच्या तालावर चहा-कॉफीची मजा घेत होते तेव्हा मुजफ्फरनगरच्या कॅम्पमधील कुटुंबं भाकरीच्या एका तुडक्यासाठी तडफडत होतं. दंगल पीडितांना पाच लाखांची मदत देण्यात आल्याचा दावा सरकार करीत होतं. मात्र गारठून मारणा-या थंडीत केवळ झोपडीत राहाणा-या या दंगलग्रस्तांची परिस्थितीच सारं काही सांगून जात होती.
जनता थंडीत गारठून मरत असताना मुख्यंमंत्री महोदय मात्र सैफई महोत्सवात दंग झाले होते.दरम्यान हे प्रकरण मीडियाने लाऊन धरल्यानंतर खुलाशात माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावरच घसरले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ