उन्नावच्या पोलीस लाईन परिसरात आढळले मानवी सांगाडे

 उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे आढळून आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. 

ANI | Updated: Jan 30, 2015, 05:50 PM IST
उन्नावच्या पोलीस लाईन परिसरात आढळले मानवी सांगाडे  title=
सौजन्य- पीटीआय

उन्नाव, उत्तर प्रदेश:  उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी सांगाडे आढळून आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. 
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्नाव शहरातल्या पोलीस लाईन परिसरात हे सांगाडे आढळून आल्यानं या घटनेला आणखीनंच गंभीर स्वरूप प्राप्त झालंय. पोलीस लाईनमधल्या एका बंद खोलीत हे सर्व मानवी सांगाडे सापडले आहेत. 
 
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या खोलीबाबत पोलिसांना संशय आल्यानं ही खोली उघडण्यात आली.  मानवी सांगाडे आढळून आल्यानं पोलिसांनी याबाबत कसून चौकशी सुरू केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.