sophisticated machine

पश्चिम पट्ट्यात भात लावणीसाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर

भात शेतीचं आगार अशी ओळख असलेला भोर, वेल्हा परिसर. या तालुक्यात पाऊस जास्त असल्याने पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. यंदा काही शेतक-यांनी अत्याधुनिक यंत्रांचा वापर करुन भात लावणी करतायत. पीढीजात पारंपरिक भातलावणी पद्धतीमुळे वेळ आणि मजुरावर जास्त खर्च होत असे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेमार्फत शेतक-यांना भातलावणी विषयी माहिती देण्यात आली. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्याने भोरमध्ये पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड होते आहे. यामुळे या योजनेचा चांगला फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Jul 9, 2017, 03:41 PM IST