sugar price दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींसाठी आणि प्रामुख्यानं स्वयंपाकामध्ये आवर्जून वापरली जाणारी साखर आता आणखी महागल्यामुळं सर्वसामान्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे

Sugar Price : साखर महागली; नवे दर पाहून लिंबू सरबतात वापरतानाही दोनदा विचार कराल

सहसा साखरेचा वापर पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी केला जातो. पण, आता हीच साखर खाताना दोनदा विचार करावा लागणार आहे, कारण आहे त्यात सातत्यानं होणारी दरवाढ. ऐन उन्हाळ्यात जिथं लिंबू सरबत, कैरीचं पन्हं किंवा इतर अनेक पदार्थ करताना साखरेला प्राधान्य दिलं जातात त्याचवेळी साखरेचे दर वधारले आहेत. त्यामुळं हीच साखर हिशोबाच्या गणितात कटुता मिसळण्याची चिन्हं आहेत. 

Apr 11, 2023, 03:14 PM IST