सातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त
सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे.
Jul 1, 2016, 06:13 PM IST