७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, सुटी जाहीर नाही!
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. दरम्यान, कलाम यांच्या निधनानंतर आज कोणतीही सुटी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.
Jul 28, 2015, 09:40 AM ISTकलाम खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस - राज ठाकरे
लहानपणी ऋषी-मुनींच्या गोष्टी ऐकल्या होत्या. ती माणसं कशी होती, कशी राहात होती काही कल्पना नाही, पण ऋषी म्हटलं की डोळ्यापुढे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची मूर्ती येते. देशाला विज्ञानाचा मंत्र तर त्यांनी दिलाच पण तो देताना त्याला एक अध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची एक विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. कलाम हे खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहली.
Jul 28, 2015, 09:25 AM IST