पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडले
पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण तापले असता भाजपमध्ये एकमत नसताना बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि माऊली थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली आहे.
May 9, 2017, 04:25 PM ISTपिंपरी महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय...!
शहरामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढावं या साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेन ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. दाम्पत्यान एका मुलीवर शस्त्रक्रीया केली तर महापालिकेकडून दाम्पत्याला २५ हजार रुपये दिले जाणार आहेत...दाम्पत्यांना दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया केली तर महापालिका १० हजार रुपये देणार आहे...!
Dec 7, 2016, 08:01 PM ISTमहापालिकेच डोके ठिकाणावर आहे का...?
ज्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली नाही त्यामुळं नागरिकांना उठा बशा काढायची शिक्षा दिली आणि त्यांच्या या प्रतापान पिंपरी चिंचवडच नावं अख्या महाराष्ट्रात बदनाम झालं, त्याच भोसरीतल्या गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक देण्याचा दानशूरपणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. एवढंच नाही तर मंडळाच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेचं तो पुरस्कार दिला जाणार असल्याने पालिकेचं डोके ठिकाणावर आहे का असं म्हणण्याची वेळ आलीय....!
Dec 6, 2016, 09:24 PM IST