मुलाकडून आईचा खून

पैशासाठी मुलाने घोटला आईचा गळा

सांगलीमध्ये पैशासाठी मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. दोन दिवसांपूर्वी मुलगा रुपेश पाटीलनं आपल्या आईचा खून केला होता. परंतु रुपेश पाटीलनं या घटनेला दरोड्याचे स्वरूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य छडा लावत मुलाला अटक केली असून सूनही संशयाच्या भोव-यात सापडली आहे

Dec 10, 2012, 06:48 PM IST