मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम
मीरारोडमध्ये मुजोर रिक्षाचालकांनी सलग चौथ्या दिवशीही बंद पुकारला आहे.आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतूकीचं नविन दरपत्रक जारी केलं होतं. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्यानं कोणतीही पूर्वसुचना न देता रिक्षाचालकांनी बंद पुकारला.
Mar 3, 2012, 06:17 PM ISTराज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम
महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.
Mar 2, 2012, 08:16 AM IST