वसंत गिते

वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला, मुलापुढे तीन नगरसेवकांचे आव्हान

महानगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिग फाईट आणि चुरशीच्या लढती होत आहेत. निवडणुकीच्या मैदानात प्रभाग  क्रमांक १५ ची निवडणूक लक्षवेधी झाली आहे. माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते यांना त्यांच्याच बालेकिल्यात तीन विद्यमान नगरसेवकांचं आव्हान आहे. त्यामुळे यानिमित्ताने अप्रत्यक्षरित्या वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Feb 10, 2017, 06:23 PM IST

स्थायी समितीच्या निवडणुकीतून मनसे गायब!

स्थायी समितीच्या निवडणुकीतून मनसे गायब!

Mar 20, 2015, 09:32 PM IST

मनसेचे प्रवीण दरेकर, वसंत गिते, रमेश पाटील भाजपात दाखल

विधानसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर मनसेपासून दुरावलेल्या मनसेच्या चार माजी आमदारांचा भाजपमधील बहुप्रतीक्षीत प्रवेश सोहळा मुबंईत आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झाला. 

Jan 13, 2015, 02:37 PM IST

मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी

राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

Jul 6, 2014, 07:43 PM IST

नाशिकमध्ये मनसे आणि भुजबळांचं साटलोटं?

मनसेच्या वसंत गीते आणि भुजबळांचं साटंलोटं असल्याचा आरोप करत हेमंत गोडसेंनी शिवसेनेत प्रवेश केला. गीतेंनी भुजबळांसमोर लोकसभेची निवडणूक लढवावी, असं आव्हानही गोडसेंनी दिलंय.

Jun 4, 2013, 08:01 PM IST