Hero ने लॉन्च केली नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर, पाहा किंमत आणि फिचर्स

भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp)ने नवी सुपर स्प्लेंडर बाईक लाँन्च केली आहे. पाहूयात कशी आहे ही नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर...

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 8, 2018, 04:22 PM IST
Hero ने लॉन्च केली नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर, पाहा किंमत आणि फिचर्स title=

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp)ने नवी सुपर स्प्लेंडर बाईक लाँन्च केली आहे. पाहूयात कशी आहे ही नवी आणि दमदार सुपर स्प्लेंडर...

१२५ सीसी असलेल्या नव्या सुपर स्प्लेंडरमध्ये आय३ एस (i3s) टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, नवी सुपर स्प्लेंडर जुन्या व्हर्जन पेक्षा अनेक पटीने अधिक चांगली आहे. 

कंपनीने तरुणांना डोळ्यासमोर ठेवून ही नवी सुपर स्प्लेंडर तयार केली आहे. या नव्या बाईकमध्ये डिझाईन आणि फिचर्समध्ये अनेक बदल्स करण्यात आले आहेत.

प्रीमिअर लुकसोबत वाईड रियर टायर

सुपर स्प्लेंडरच्या नव्या मॉडेलचा हा प्रीमिअर लूक आहे. या गाडीत सीटखाली स्टोरेज देण्यात आलं आहे. यासोबतच साईड युटीलिटी बॉक्स आणि वाईड टायरने अपडेट केलयं. 

पाच रंगांत उपलब्ध

नवी हीरो सुपर स्प्लेंडर पाच रंगांत उपलब्ध आहे. यामध्ये पर्पल, ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ सिल्वर, लाल आणि ग्रे या रंगांचा समावेश आहे.

असं आहे इंजिन

या बाईकमध्ये १२५ सीसी TOD (Torque-on-Demand) इंजिन देण्यात आलं आहे. ४ स्पीडि गिअरबॉक्स इंजिन असलेल्या या गाडीचं इंजिन जुन्या मॉडलपेक्षा अधिक दमदार आहे. १२५ सीसी असलेलं हे इंजिन ७,५०० rpm वर ११.४ पीएसची पॉवर आणि ६,००० rpm वर ११ न्यूटन मीटरचं टॉर्क जनरेट करतं.

काय आहे आय ३ एस टेक्निक

आय ३ एस टेक्निकमध्ये जर तुम्ही ट्रॅफिक जाममध्ये अथवा एखाद्या कामासाठी गाडी थांबवली आहे आणि तुमची बाईक न्यूट्रल मोडवर असेल तर बाईक ऑटोमेटिक बंद होईल. यामुळे तुमचं फ्युअल वाचण्यात मदत होणार आहे. याचा थेट परिणाम बाईकच्या मायलेजवर होणार आहे.

किती आहे किंमत?

नव्या सुपर स्प्लेंडरची दिल्लीतील एक्स शोरुम प्राईज ५७,१९० रुपये आहे.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x