व्हॉट्सअॅप क्रश झाल्यावर नेमके काय कराल...?

31 डिसेंबरच्या संध्याकाळी व्हॉट्सअॅप क्रश झाल्याची बातमी कानी आली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 2, 2018, 05:44 PM IST
व्हॉट्सअॅप क्रश झाल्यावर नेमके काय कराल...? title=

नवी दिल्ली : 31 डिसेंबरच्या संध्याकाळी व्हॉट्सअॅप क्रश झाल्याची बातमी कानी आली. तासभर तरी व्हॉट्सअॅपने युजर्संना त्रास दिला. 2 तास व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन होते. मात्र व्हॉट्सअॅप क्रश कसे होते, याचे कारण काय आणि असे झाल्यास नेमके काय करावे. जाणून घेऊया... काही ट्रिक्सचा वापर केल्याने आपण ही समस्या सोडवू शकतो.

व्हॉट्सअॅप क्रश का होते?

व्हॉट्सअॅपचे सुमारे 1 बिलियन युजर्स आहेत. मात्र जगभरात एकाच वेळी व्हॉट्सअॅप क्रश होण्याची घटना खूप कमी वेळा घडली आहे. सर्व्हर लोड वाढल्याने व्हॉट्सअॅप क्रश होते. मात्र लवकरच ते ठीक करता येऊ शकते.

चॅटींग डिलीट करा

चॅटींग सेव्ह करून ठेवण्याचा मोह व्हॉट्सअॅप क्रश होण्याचे कारण ठरू शकते. जेव्हा अॅपमध्ये खूप सारे मेसेजेस स्टोर असतात तेव्हा अॅप क्रश होऊ लागतो. त्यामुळे चॅटींग डिलीट करत रहा. यामुळे अॅपवर लोड कमी येईल आणि स्पेस देखील राहील.

कॅशे डेटा क्लिअर करा

फोनमध्ये व्हॉट्सअॅपमधये असा मेसेज आल्यास लगेचच कॅशे डेटा क्लिअर करा. यासाठी मोबाईलमध्ये अॅपलिकेशन मॅनेजरमध्ये जा. तिथे अॅप सिलेक्ट करा. त्यात तुम्हाला  Clear Cache चा ऑप्शन दिसेल. तिथे Cache क्लिअर करा.

सातत्याने अपडेट करा

व्हॉट्सअॅप अपडेट नसल्याने देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सारखा सारखा क्रश होण्याची समस्या उद्भवल्यास व्हॉट्सअॅप अपडेट करा. यामुळे नवीन फिचर्सचा फायदा देखील युजर्सना मिळू शकतो.

सिम बदलल्यावर

जर तुम्ही नवीन सिम घेतले असेल तर त्या नंबरवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. यासाठी तुम्हाला नंबर रजिस्टर करावा लागेल. त्यानंतरच व्हॉट्सअॅप काम करणे चालू करेल.

रिइंस्टाल करा

जर कोणतीच ट्रिक कामी न आल्यास व्हॉट्सअॅप अनइंस्टाल करा आणि पुन्हा इंस्टाल करा. अधिकतर युजर्स असेच करतात. ही ट्रिक अनेकदा कामी येते.