VIDEO : BSF जवानाचं हे गाणं ऐकताच तुमचं ऊर भरून येईल

सोशल मीडियावर व्हिडिओला अधिक पसंती 

VIDEO : BSF जवानाचं हे गाणं ऐकताच तुमचं ऊर भरून येईल title=

मुंबई : आपल्या घरात आज आपण अतिशय शांतपणे राहत आहोत. याची संपूर्ण जबाबदारी आपल्या जवानांनी घेतली आहे. दिवस-रात्र देशाची सेवा करत आपल्या नागरिकांची सुरक्षा करत आहेत. आपल्या कुटुंबापासून, नातेवाईकांपासून हे जवान दूर राहून देशाची सेवा करत असतात. वेळ प्रसंगी शहिद होण्यासाठी देखील हे जवान तयार असतात. 

आपण वर्षभर सण साजरे करतो. एकमेकांसोबत वेळ घालवून आनंद साजरा करत असतो. पण या जवानांकरता मनोरंजनाचं काहीच साधन नाही. ते आपलं मन रमवण्यासाठी आपल्या कॅम्पमध्येच प्रयत्न करतात. अनेकदा आपण BSF जवानांचे व्हिडिओ वायरल झालेले पाहिले आहेत. बर्फाने आच्छादलेल्या या परिसरात आपला आनंद साजरा करत असतात. पण आता BSF जवानाचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. 

या व्हिडिओमध्ये जवानाने 'बॉर्डर' सिनेमातील 'संदेशे आते है...' हे गाणं गायलं आहे. तुम्ही या जवानाचं गाणं ऐकून अगदी मंत्रमुग्ध व्हाल. तर पाहूया या जवानाचा हा व्हिडिओ... 

मल्टी स्टारर सिनेमे बनवणारे निर्माता आणि दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या 'बॉर्डर' या सिनेमातील हे गाणं आहे. या सिनेमातील हे गाणं अतिशय लोकप्रिय आहे. आजही हे गाणं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी आपल्या सगळ्यांच लक्ष वेधून घेतं. हा सिनेमा इतर दिवशी देखील प्रेक्षकांच्या पसंतीचा सिनेमा आहे.या व्हिडिओतील जवानाने हे गाणं गाऊन देशभक्ती पुन्हा एकदा जागी केली आहे. जवानाचा आवाज अतिशय सुंदर असून त्याने बाकीच्या जवानांच मनोरंजन देखील केलं आहे.