Elon Musk On AI Generated Photos: आर्टिफिशल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक क्रांती घडताना दिसत आहे. मोठमोठी कामं आता सेकंदात केली जात आहे. त्यामुळे आता जग वेगवान दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर आर्टिफिशल इंटेलिजन्सचे फोटो व्हायरल (Viral AI Photos) होत असतात. त्यामुळे भुतकाळात एखादा मनुष्य कसा दिसला असता किंवा तो भविष्यात कसा दिसेल, याचा अंदाज वर्तविला जातो. अशातच आता ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
इंटरनेटवरून दररोज काहीतरी नवीन समोर येतं. नेटकरी सोशल मीडियावर आश्चर्यकारक गोष्टी शेअर करत असतात. अशाच एका युजरने एलोन मस्कच्या बालपणीची एआय इमेज शेअर (Elon Musk AI Generated Photo) केली आहे. हा फोटो पाहून मस्क यांना देखील रहावलं नाही. या व्हायरल फोटोवर लोक खूप कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इलॉन मस्क यांनी देखील या फोटोवर (childhood Photos of Elon Musk) प्रतिक्रिया दिली.
BREAKING: Elon Musk was reportedly working on some anti aging formula but it got way out of hand pic.twitter.com/uvAkWI3FgT
— Not Jerome Powell (@alifarhat79) June 3, 2023
मित्रांनो, मला वाटतं की मी खूप काही घेतलं असेल, असं इलॉन मस्क म्हणतात. त्यावेळी त्यांनी कमेंट करताना एक लहान मुलाचा इमोजी देखील शेअर केला. काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांचा भारतीय पारंपारिक कपड्यातील एक एआय फोटो व्हायरल झाला होता. भारतीय लग्नातील पारंपारिक ड्रेसमधील हा फोटो (Elon Musk In Traditional Indian Dress) होता. त्यावर एलॉन मस्क यांनी कमेंट केली. मला हा फोटो आवडला, असं मस्क यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शॉपिंग, फॅशन, रिटेल, सुरक्षा, क्रीडा, उत्पादनं डेटा अॅनालिसिस यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता काम अधिक सोपं झाल्याचं दिसतंय. AI Camera, Chat Bots, Google Lens, Google Assistant, Alexa ही देखील दैनंदिन वापरात उपयोगीची साधणं आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर मानवी जीवन सुखकर केला जाईल. मात्र, याचा वापरच चुकीच्या पद्धतीने देखील केला जाऊ शकतो. याची अनेक उदाहरणं मागील काही काळात पहायला मिळाली आहेत.