नोकिया स्मार्टफोनच्या खरेदीवर एअरटेल ग्राहकांना मोठी सूट !

हा स्मार्टफोन अवघ्या तासाभरात पूर्ण चार्ज होतो.

Updated: Jan 11, 2019, 11:46 AM IST
नोकिया स्मार्टफोनच्या खरेदीवर एअरटेल ग्राहकांना मोठी सूट ! title=

नवी दिल्ली - भारतीय बाजारात नोकिया स्मार्टफोन कंपनीने नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनचे अनावरण केले होते. परंतु, नोकियाच्या ६.१ प्लस स्मार्टफोनची विक्री केवळ ऑनलाईन माध्यमातून केली जात होती. स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना फ्लिपकार्ट किंवा नोकिया स्टोअरची निवड करावी लागत असे. आता नोकिया कंपनीने या स्मार्टफोनची विक्री ऑफलाईन केली आहे. बाजारात नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. ऑफलाईन खरेदीतून ग्राहकांना मोठी सूट देण्यात येणार आहे. नोकिया स्मार्टफोन कंपनीने दूरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरटेलसोबत भागीदारी केली आहे. एअरटेलच्या ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी केल्यास २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. एवढेच नव्हे तर एअरटेलच्या ग्राहकांना १ वर्षासाठी २४० जीबी डेटा मिळणार आहे. 

 

नोकिया ६.१ प्लसचे वैशिष्ट्ये

स्मार्टफोनमध्ये ५.८ इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. प्राइमरी कॅमेरा १६ मेगापिक्सल आहे. तर सेकंडरी कॅमेरा ५ मेगापिक्सल असून या फोनमध्ये सेल्फी कॅमेराचादेखील समावेश करण्यात आला आहे. नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमधील स्टोअरेज ६४ जीबी असून, ते ४०० जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. हा फोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. नोकिया ६.१ प्लस स्मार्टफोनची बॅटरी ३ हजार ६० एमएएच आहे. हा स्मार्टफोन अवघ्या तासाभरात पूर्ण चार्ज होतो.