फ्लॅश सेलद्वारे जिओच्या नव्या स्मार्टफोनची खरेदी करण्याची संधी

या  jio phone-२  स्मार्ट फिचर फोनची किंमत २ हजार ९९९ इतकी आहे. 

Updated: Jan 10, 2019, 11:02 AM IST
फ्लॅश सेलद्वारे जिओच्या नव्या स्मार्टफोनची खरेदी करण्याची संधी

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात जिओने प्रवेश केल्यापासून कंपनीने ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणि परवडणाऱ्या दरात फिचरफोन उपलब्ध करुन दिले आहेत. खिशाला परवडणाऱ्या दरांमुळे ग्राहकांनी देखील जिओला पंसती दिली. जिओने परत एकदा ग्राहकांसाठी नवा स्मार्टफोन उपलब्ध केला आहे. jio phone-२ हा नवा फिचर फोन बाजारात उपलब्ध झाला आहे. आजपासून (१० जानेवारी) jio  phone-२ या स्मार्ट फिचर फोनची फ्लॅश सेलच्या माध्यामातून विक्री सुरु होणार आहे. हा सेल आज दुपारी १२ पासून सुरु होईल. हा स्मार्ट फिचर फोन ग्राहकांना jio.com या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. या  jio phone-२  स्मार्ट फिचर फोनची किंमत २ हजार ९९९ इतकी आहे. 

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

या jio phone- २ ची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मोबाईलचे डिझाइन तसेच याचा की-बोर्ड हा क्वेर्टी आहे.  या मोबाईलचा रॅम ५१२ mb आहे. तर इंटरनल स्टोअरेज ४ जीबी इतके आहे. ही क्षमता मेमरी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. हा स्मार्ट फिचर फोन २  kai os या प्रणालीनुसार काम करणार आहे. या मोबाईलची बॅटरी पॉवर २ हजार mh इतकी आहे.

या स्मार्ट फिचर फोनमध्ये मोबाईल ऑपरेट करण्यासाठी एक स्वतंत्र बटण दिले आहे. याच्या मदतीने युजर्स गुगल असिस्टंट सुरु करु शकतील. तसेच या गुगल असिस्टटंच्या साह्याने आवाजाद्वारे (व्हॉईस) आदेश देऊन म्युझिक, हवामानाची माहिती, बातम्या या सेवा प्राप्त करु शकतात. या मोबाईलमध्ये इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा समाविष्ट आहेत. सोबतच ब्लूटूथ, जीपीएस, रेडिओसारखे फिचर्स देखील आहेत. जिओ फोनच्या तुलनेत या मोबाईलचा डिस्प्ले आकाराने मोठा आहे. परवडणाऱ्या किंमतीत अनेक फिचर्स असल्याने या स्मार्ट फिचर फोनला ग्राहकांकडून भरभरून दाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.