Airtel चा जबरदस्त प्लान, 299 रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉल्स

एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवा आणि धमाकेदार प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स आणि मेसेजेसची सुविधा मिळणार आहे.

Updated: May 31, 2018, 01:17 PM IST
Airtel चा जबरदस्त प्लान, 299 रुपयांत मिळवा अनलिमिटेड कॉल्स title=

मुंबई : एअरटेलने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवा आणि धमाकेदार प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स आणि मेसेजेसची सुविधा मिळणार आहे. 299 रुपये किंमत असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल-एसटीडी, रोमिंग वॉईस कॉल्सची सुविधा मिळणार आहे. खास बाब म्हणजे या प्लानमध्ये कॉलिंगसाठी कुठलीच मर्यादा ठेवलेली नाहीये म्हणजेच हा प्लान पूर्णपणे कॉलिंग प्लान आहे.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, 299 रुपयांचा हा प्लान अशा युजर्ससाठी आहे जे मोठ्या प्रमाणात कॉलिंग करत असतात. या प्लानमध्ये कॉल्ससोबतच दररोज 100 SMS ची सुविधाही मिळणार आहे. या प्लानची वैधता 45 दिवसांची असणार आहे. एअरटेलने हा प्लान अशा ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे जो कॉल्स आणि मेसेजेसचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

खास बाब म्हणजेच एअरटेलने याच किंमतीत म्हणजेच 299 रुपयांत आणखीन एक प्लान ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. यामध्ये FUP लिमिटसोबतच अनलिमिटेड कॉल, दररोज 100 मेसेजेस आणि 1.4 GB डेटा दररोज मिळणार आहे. या प्लानची वैधता 42 दिवसांची असणार आहे. या प्लान संदर्भात एअरटेलने आपल्या वेबसाईटवर किंवा अॅपवर कुठलीही माहिती दिलेली नाहीये.

काही दिवसांपूर्वीच एअरटेलने 499 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा देण्यात येत आहे. अशा प्रकारे या प्लानमध्ये 70 दिवसांत 140 GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल्स, 100 SMS आणि दररोज 2 GB डेटा 70 दिवसांसाठी मिळणार आहे.