चीन पाठोपाठ अमेरिकेने प्रयोगशाळेत बनवला सूर्य; मग खऱ्या सुर्याचे काय होणार?

सूर्य हा उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र, दिवसेंदिवस सूर्याच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. यामुळे सूर्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे संशोधकांनी आत्तापासनत कृत्रिम सूर्याची निर्मी केली आहे. सूर्यापासून मिळते तशीच ऊर्जा या कृत्रिम सूर्यापासून मिळते. 

Updated: Dec 14, 2022, 07:15 PM IST
चीन पाठोपाठ अमेरिकेने प्रयोगशाळेत बनवला सूर्य; मग खऱ्या सुर्याचे काय होणार? title=

Artificial Sun : चीन(china) पाठोपाठ आता अमेरिकेने(America) देखील प्रयोगशाळेत कृत्रिम सूर्याची(Artificial Sun) निर्मीती केली आहे. अमेरिकेने निर्माण केलेला हा सूर्य चीनच्या कृत्रीम सूर्यापेक्षा अधिक पटीने ऊर्जा निर्मीती करणारा आहे. भविष्यात खऱ्या सूर्याचे अस्तिस्तव नष्ट होणार आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.  यामुळेच सौरप्रकाशाद्वारे उर्जा निर्मिती केली जाते. मात्र, लवकरच सूर्याचे अस्तित्व नष्ट होणार आहे. लोडशेडिंग, वीजटंचाईची समस्या सर्वांनाच भेडसावत असते. पण आता ही समस्या लवकरच दूर होणार आहे.. कारण फक्त एक ग्लास पाण्यातून घराला वर्षभर पुरेल इतकी वीजनिर्मिती करता येणं शक्य होणार आहे. कृत्रिम सूर्यामुळे ही किमया साधली जाणार आहे. 

अमेरिकेत न्यूक्लिअर फ्यजूनपासून उर्जानिर्मिती करण्यात संशोधकांना यश आलंय. LLNL प्रयोगशाळेत न्यूक्लिअर फ्यूजनपासून ऊर्जानिर्मिती करण्यात आली आहे. प्रयोगासाठी लागलेल्या ऊर्जेपेक्षा प्रयोगातून मुक्त झालेली ऊर्जा अधिक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

ही वीज अणुऊर्जेपेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. भविष्यातील स्वच्छ, अखंड ऊर्जास्त्रोत निर्मितीचं हे पहिलं पाऊल ठरणार आहे. यावर अधिक संशोधन होऊन जर निर्मितीप्रकल्प अस्तित्वात आला, तर फक्त एक ग्लास पाण्यापासून एका घराला वर्षभर पुरेल इतकी वीज निर्मिती करता येणं शक्य होईल.

कशी होणार कृत्र्म सूर्यापासून विजनिर्मीती

ड्युटेरिअम आणि ट्रीटियम आयसोटोप्समध्ये संयोग प्रक्रिया केली जाणार. अणुकेंद्रक संयोग प्रक्रियेत घातक पदार्थ तयार होत नाहीत. तयार झालेल्या उर्जेपासून वाफ तयार करुन वीजनिर्मिती केली जाणार आहे. अणुऊर्जेपेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित वीजनिर्मितीचा दावा केला जात आहे. भारत, अमेरिका, युरोपसह 35 देश या प्रयोगामध्ये सहभागी होणार आहेत.

सूर्य हा उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र, दिवसेंदिवस सूर्याच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. यामुळे सूर्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे संशोधकांनी आत्तापासनत कृत्रिम सूर्याची निर्मी केली आहे. सूर्यापासून मिळते तशीच ऊर्जा या कृत्रिम सूर्यापासून मिळते.