या तारखेपासून तुमचा Android स्मार्टफोन होऊ शकतो बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही?

तुमच्याकडे हा Android स्मार्टफोन आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची! या तारखेपासून काम करणार नाही कारण...

Updated: Sep 4, 2021, 05:03 PM IST
या तारखेपासून तुमचा Android स्मार्टफोन होऊ शकतो बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही? title=

मुंबई: प्रत्येककडे आता स्मार्टफोन आहे मात्र त्यातले काही फोन हळूहळू आऊटडेटेड होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे कंपनी नवी व्हर्जन आणि जास्त अपडेट्ससह नवीन फोन बाजारपेठेत आणत आहे. आपला फोन वेळोवेळी आपल्याला अपडेट करावा लागतो. नाहीतर तो फोन आपल्याला हऴूहऴू त्रास देऊ लागतो. मात्र आता काही Android स्मार्टफोन असे आहेत की ते येत्या दिवसांमध्ये काम करणंच बंद करू शकतात असं सांगण्यात आलं आहे. 

तुमच्या हातातला फोन काम करायचा अचानक बंद झाला तर? आपला अर्धा जीव त्या फोनमध्ये असतो अशावेळी या फोनमध्ये तुमचा तर फोन नाही ना हे आजच तपासणं गरजेच आहे. तुमचा फोन आऊटडेटेड होणार असेल तर त्यावर तोडगा काढणं अर्थातच नवीन घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास होईल.

9 to 5 Google च्या एका रिपोर्टनुसार सर्व Android फोन युझर्स जे Android 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जन असलेले फोन अजूनही वापरत आहेत, अशा लोकांना हा त्रास होऊ शकतो. 27 सप्टेंबर 2021 पासून त्यांच्या फोनवर Google अॅप्स चालणार नाहीत. हे व्हर्जन वापरणाऱ्या लोकांना फक्त कॉलिंगची सुविधा उपलब्ध राहिल. गुगलने या कॅटेगरीतील सर्व वापरकर्त्यांना एक मेल पाठवला आहे. ज्याच्या फोनमध्ये Android  2.3.7 किंवा त्याआधीचं व्हर्जन आहे त्यांना गुगलची सेवा वापरता येणार नाही. 

27 सप्टेंबरनंतर Android 2.3.7 किंवा त्याच्या कमी व्हर्जनमधील युझर्स ई मेल, युट्यूब किंवा इतर गुगलला सपोर्ट करणारे अॅप वापरता येणार नाहीत. गुगलसह कोणतेही अॅप या व्हर्जनला सपोर्ट करणार नाही. तुमच्या फोनच्या स्क्रीनवर ‘Username or password error’ असं लिहिलेलं दिसेल. 

तुम्ही जर अॅन्ड्रॉइड अॅप अपडेट करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा नवीन अकाऊंट तयार करण्याचा प्रयत्नात असाल तर थांबा. कारण आता तुमच्या या जुन्या व्हर्जनमध्ये कोणतेही अॅप चालणार नाहीत. एकतर तुम्ही तुमचा फोन अपडेट करा किंवा नवा फोन घ्या हे दोनच पर्याय तुमच्याकडे असणार आहेत.