मुंबई : गेल्या काही वर्षापासून सायबर हल्ल्याच्या घटना वाढल्य़ा आहेत. या सायबर हल्लेखोरांनी आता मोबाईमध्येही घुसखोरी करून नागरीकांचा वैयक्तिक डेटा चोरी करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गुगल प्लेस्टोरने मोबईलमधल्या अशा अॅप्सना हटवून सुद्धा अशा घटना घडतच आहेत. आता पुन्हा एकदा नवीन मालवेअरने नागरीकांच्या मोबाईलमध्ये घुसखोरी करत डेटा चोरी करायला सुरुवात केली आहे.मात्र त्यांची ही चोरी पकडली गेली आहे. यासोबत गुगल प्लेस्टोरने देखील डेटा लिक करणारे अॅप्स काढून टाकले आहेत. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये देखील असे अॅप्स असतील तर आताच हटवा.
Google ने Play Store अॅप्सवर एक नवीन मालवेअर शोधला आहे, जो युझर्सच्या मोबाईल मधला डेटा चोरी करत आहे. तसेच युझर्सला कोणतीही माहिती न देता प्रीमियम सेवांचे सदस्यत्व घेत आहे. या मालवेअरचे नाव Autolycos असे सांगितले जात आहे. गुगल प्ले स्टोअरच्या या 8 अॅप्समध्ये या मालवेअरचा शिरकाव झाला होता. त्यामुळे एका रिपोर्टनुसार, गुगलने हे सर्व अॅप प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. विशेष म्हणजे गुगलने बॅन करून सुद्धा अनेक य़ुझर्स अजूनही ते अॅप्स वापरत आहेत. त्यामुळे अजूनही युझर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. हे अॅप्स आम्ही तूम्हाला खाली देत आहोत.
'हे' आहेत अॅप
ब्लीपिंग कॉम्प्युटर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही अॅप अजूनही प्ले स्टोअरवर सक्रिय आहेत. जर ते अॅप अजूनही एखाद्याच्या फोनमध्ये असतील तर तो मोठा युझरला मोठा धोका असू शकतो. त्यामुळे तुमचा फोन तपासा आणि तुमच्याकडे वरीलपैकी कोणतेही अॅप्स असल्यास ते ताबडतोब डिलीट करा, अन्यथा तुमचा वैयक्तिक डेटा देखील चोरीला जाऊ शकतो.