अॅपलचा सर्वात स्वस्त ipad लॉन्च...

अॅपलने अमेरिकेत झालेल्या एका इव्हेंटमध्ये एक नवीन iPad डिव्हाईस लॉन्च केला.

Updated: Mar 28, 2018, 11:02 AM IST
अॅपलचा सर्वात स्वस्त ipad लॉन्च... title=

नवी दिल्ली : अॅपलने अमेरिकेत झालेल्या एका इव्हेंटमध्ये एक नवीन iPad डिव्हाईस लॉन्च केला. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त iPad असल्याचे म्हटले जात आहे.अॅपलने ग्राहकांसाठी ३२ जीबी वायफाय मॉडलची किंमत 329 डॉलर म्हणजे सुमारे २१,३३८ रुपये ठेवली आहे. मात्र हा iPad विद्यार्थ्यांना २९९ डॉलर म्हणजे सुमारे १९,३९१ रुपयांना मिळेल. तर ३२ जीबी वायफाय+सेल्यूलर मॉडलची किंमत ४५९ डॉलर ठेवण्यात आली आहे. अॅपलचा हा टॅबलेट यावर्षी एप्रिलमध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात iPad ३२ जीबी व्हर्जनची किंमत २८,००० रुपये आणि ३२ जीबी वायफाय+सेल्यूलर व्हर्जनची किंमत ३८,६०० रुपये असेल. 

१० तासाचे बॅटरी बॅकअप

iPad ला पुढच्या बाजूने टचआयडी दिलेले आहे. यात फेसटाईम फ्रंट कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा iPad एलटीई सपोर्टसोबत देण्यात आलेला आहे. यात १० तासाचे बॅटरी बॅकअप मिळेल, असा कंपनीने दावा केला आहे.

फिचर्स

  • ए10 फ्यूजन चिपसेट देण्यात आले आहे. जे AR (आग्मेन्ट रिएलिटी) अॅप्सला सपोर्ट करतात.
  • फोनमध्ये रिअर कॅमेरा फुल एचडी व्हिडिओला सपोर्ट करतो.
  • जीपीएस, कम्पस आणि टचआयडीशिवाय यात ३०० एमबीपीएस पर्यंतची एलटीई कनेक्टीव्हीटी सपोर्ट करेल.
  • विद्यार्थ्यांसाठी, फ्री रिव्हर्स आणि काही अन्य अॅप्स दिले आहेत.
  • आयक्लाऊड स्टोरेजला वाढवून ५ जीबी ते २०० जीबी करण्यात आली आहे.

शिकागोमध्ये लॉन्च

अमेरिकेच्या शिकागोमध्ये अॅपलने एका इव्हेंटमध्ये आयपॅड लॉन्च केला आहे. इव्हेंटमध्ये दरम्यान कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी सांगितले की. यावर्षी iPad ला क्लासपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमेरिकेत याची विक्री सुरु झाली असून पुढच्या आठवड्यापासून शिपिंग सुरू होईल.