मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Today Rate) वाढत्या किंमतीनं सर्वसामन्य बेहाल झाले आहेत. इंधनाच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीमुळे वाहनचालकांना आपला मोर्चा हा इलेक्ट्रीक वाहनांकडे (electric vehicle) वळवला आहे. अनेक राज्य सरकार देखील इलेक्ट्रीक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रीक व्हीकल (electric vehicle policy 2021) योजना लागू करत आहेत. सरकारच्या या योजनांचा आणि विविध प्रयत्नांचा मोठा परिणाम हा इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतीवर झाला आहे. याचदरम्यान आता प्रसिद्ध इलेक्ट्रीक वाहन निर्माता कंपनी एथरने (Ather) इलेक्ट्रीक व्हीकल पॉलिसी 2021 नंतर Ather 450 Plus च्या किंमतीत बदल केले आहेत. कंपनीचे सीईओ यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. (Ather 450 Plus scooter cheaper by 24 thousand rupees in Maharashtra after new electric vehicle subsidy)
ट्विटमध्ये काय म्हंटलंय?
"इलेक्ट्रीक व्हीकल योजनासाठी आभारी आहे. महाराष्ट्रात अखेर ईव्ही सब्सिडी लाईव्ह होत आहे. ज्यामुळे इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 24 हजारांनी कमी झाली आहे. आता राज्यात या स्कूटरची नवी किंमत ही 1 लाख 3 हजार इतकी असणार आहे. जी अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहे", असं कंपनीचे सीईओ तरुण मेहता ट्विटमध्ये म्हंटलंय.
स्कूटरची किंमत किती?
कंपनीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला मोठा फायदा झाालाय. Ather 450 Plus तब्बल 24 हजारांनी स्वस्त झाली आहे. आधी Ather 450 Plus ची किंमत ही 1लाख 28 हजार इतकी होती. मात्र आता स्कूटर 24 हजारांनी स्वस्त झाल्याने नवी किंमत ही 1 लाख 3हजार इतकी आहे. ही एक्स शोरुम प्राईज आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात कमी आहे.
Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरचं वैशिष्ट्य
या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 2.4 k WH इतकी क्षमता असलेल्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे.
या इलेक्ट्रीक स्कूटरच्या मोटरची पावर ही 5.4 kW असून 22Nm इतरका टॉर्क जनरेट करतो.
कंपनीनुसार, स्कूटर अवघ्या 4 सेंकदात 0 ते 40 किलोमीटर वेग धारण करण्यात सक्षम आहे.
स्कूटर सिंगल चार्जमध्ये 70 किलोमीटर प्रवास करता येतो.
स्कूटर रेग्युलर चार्जरने चार्ज करण्यासाठी साधारण 5 तास 45 मिनिट इतका वेळ लागतो.