मोबाइल बिल, OTT सब्सक्रिप्शन होईल फेल, 1 एप्रिलपासून ऑटो डेबिटचे नवे नियम

नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू 

Updated: Mar 30, 2021, 02:41 PM IST
मोबाइल बिल, OTT सब्सक्रिप्शन होईल फेल, 1 एप्रिलपासून ऑटो डेबिटचे नवे नियम title=

नवी दिल्ली : Auto Debit Fail from April 1 मोबाईल बिल (Mobile Bill), वीजबील किंवा इतर कोणतेही बिल (Utility bill) भरण्यासाठी आपण ऑटो-डेबिट पेमेंट्सची सुविधा (recurring auto-debit payments) वापरतो. पण १ एप्रिलपासून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण 31 मार्चपासून रिझर्व्ह बँकेकडे Additional Factor Authentication (AFA)साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची अंतिम मुदत आहे.

1 एप्रिलपासून बिल देयकाच्या ऑटो डेबिटमध्ये अडचण येऊ शकते. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पुन्हा पेमेंट करण्याकरिता या गाईडलाईन्स असतील. हे नवीन मार्गदर्शक तत्त्वे ओटीटी सबस्क्रीप्शन आणि डिजिटल न्यूज सब्सस्क्रीप्शनच्या ऑटो डेबिटवर देखील लागू होतील. आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम लाखो ग्राहकांवर होणार आहे. 1 एप्रिलपासून त्यांची बिले आणि सब्सस्क्रीप्शन ऑटो डेबिट होणार नाही. 

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बँकांना अनिवार्य आहे. असे न केल्यास e-mandates दिलेल्या लाखो ग्राहकांचे पेमेंट फेल होऊ शकते असा इशारा  इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएएमएआय) दिला आहे. अनेक बँकांनी e-mandates साठी नोंदणी, ट्रॅकिंग, फेरबदल व पैसे काढण्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालन केले नाहीय.

एप्रिलमध्ये 2000 कोटी रुपयांपर्यंतच्या देयकावर परिणाम होऊ शकतो. ज्यामध्ये कार्डे, युटिलिटी बिले, ओटीटी आणि मीडिया सबस्क्रिप्शन्स तसेच एमएसएमई, कॉर्पोरेट्स अशा सर्व क्षेत्रांचा समावेश आहे. 

रिझर्व्ह बँकेने बँकांना, नॉन-बँक प्रीपेड इन्स्ट्रुमेंट जारीकर्ता, अधिकृत कार्ड पेमेंट नेटवर्क यांना ई-आदेश प्रक्रियेसाठी दोन परिपत्रके जारी केली आहेत. याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे, जी उद्या संपणार आहे.

आरबीआयची नवी मार्गदर्शक तत्त्वे 

आरबीआयच्या नव्या नियमांनुसार बँकांना पेमेंटच्या तारखेच्या 5 दिवस आधी अधिसूचना पाठवावी लागेल.ग्राहकाने मंजूरी दिली तरच पेमेंट मंजूर होईल. जर रिकरिंग पेमेंट 5000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर बँकांना ग्राहकांना वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवावा लागेल. ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.