नवी दिल्ली : तुम्ही कार मालक आहात ? तुम्ही वेळोवेळी गाडीतील इंजिन ऑईल (Engine Oil)बदलता ? जर बदलत नसाल तर हा निष्काळजीपणा वेळीच सोडून द्या. गाडीमध्ये इंजिन ऑईल न बदलल्यास भविष्यात तुम्हाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तेव्हा ही खूप खर्चिक बाब होऊ शकते.
आपण वेळोवेळी कारमधील इंजिन ऑईल बदलले नाही तर आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागेल असे गुड इयर लूब्रिकंट्सचे कंट्री हेड संजय शर्मा यांनी सांगितले.
इंजिन ऑईल (Engine Oil)मध्ये लुब्रिकेशनमुळे इंजिनच्या प्रत्येक भागाला संरक्षण मिळते. हे भाग एकमेकांना स्वच्छ ठेवतात. अशा परिस्थितीत ऑईल वेळोवेळी न बदलल्यास समस्या उद्भवू शकते. इंजिनवर देखील त्याचा परिणाम होतो. सातत्याने ऑईलचा वापर केल्यास घर्षण कमी करणारे घटक कमी होतात. याचा अर्थ ऑईलमध्ये ती पॉवर राहीली नाहीय.
जेव्हा वाहनात इंजिन तेलाची कमतरता असते तेव्हा त्यातील भागाला लुब्रिकेशन म्हणजे चिकटपणा मिळत नाही. यामुळे, भाग एकमेकांच्या संपर्कात येतात आणि घर्षणामुळे मोठा आवाज येऊ लागतो. जर तेलाची पातळी कमी असेल तर इंजिनमध्ये तेलाच्या दाबामुळे बेरिंगचा आवाज येऊ लागतो.
इंजिन हा कारचा सर्वात महत्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत आपण वेळेवर ऑईल बदलले नाही तर तुमच्या अपेक्षेइतके दिवस गाडी चालवू शकणार नाहीत. ऑईल न टाकल्यास आपल्या वाहनाच्या इंजिनचा काही भाग चिकटपणा आणि सुरक्षिततेच्या अभावामुळे थांबतात.
जर आपल्या वाहनाच्या इंजिनमध्ये नेहमीच योग्य प्रमाणात ऑईल नसेल तर ते इंजिनवर तणाव निर्माण करू शकते. यामुळे, वाहनाचे इंजिन अति तापण्यास सुरुवात होते. कूलेंट वाहनाच्या तापमानाला नियंत्रित करते.
जर आपण गाडी किंवा कारमध्ये इंजिन ऑईलचे प्रमाण कायम ठेवले नाही तर तुमचा खर्च वाढणार हे नक्की आहे. बर्याच लोकांना असे वाटते की तेल परत वारंवार बदलणे हे खर्चिक आहे. पण असे न केल्यास इंजिन खराब होऊ शकते आणि त्यानंतर जर आपण इंजिन ठिक करायला जाल तर ऑईलपेक्षाही जास्त खर्च तुम्हाला येईल. (पीटीआय)