close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॅडन्यूज ! तर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही.

जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे मॅसेंजर अ‌ॅप Whatapp ने अलीकडील काळात अनेक बदल केले आहेत. अनेक फीचर्स आणि भरपूर सुविधा व्हॉट्सअॅपमध्ये मिळत आहेत. 

Updated: Apr 19, 2019, 07:56 PM IST
बॅडन्यूज ! तर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही.

मुंबई : जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे मॅसेंजर अ‌ॅप Whatapp ने अलीकडील काळात अनेक बदल केले आहेत. अनेक फीचर्स आणि भरपूर सुविधा व्हॉट्सअॅपमध्ये मिळत आहेत. पण एका वृत्तानुसार, लवकरच Whatapp वर केली जाणाऱ्या चॅटचा स्क्रीनशॉर्ट घेता येणं बंद होणार आहे. Whatapp या विशिष्ट फीचरची तपासणी करत आहे. एक विश्वासार्ह स्रोत WABetaInfo च्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप एक विशेष सुविधा आणण्याचा विचार करत आहे. जो वापरकर्त्यांना पर्यायाने स्क्रीनशॉट घेण्याकरीता नाकारेल. हे अ‌ॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन बाब आहे.

Whatapp च्या या चाचणीनंतर जाणकरांच्या मते, कंपनी आपल्या युजर्सची संवेदनशील माहिती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू नये म्हणून हे नवीन फीचर आणत आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची गोपनीयतेची काळजी घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे. सध्या Whatapp वर केलेले चॅटचे स्क्रीनशॉट घेणे आणि ते दुसरीकडे शेअर करणे अत्यंत सोपे आहे. त्यामुळे कंपनी यावर काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Whatapp च्या या नव्या फीचरमुळे चूकीचे मेसेज येण्यावर आणि ते चुकीचे मेसेज पसरवण्यावर 100% आळा बसू शकणार नाही. पण या नवीन फीचरमुळे चुकीचे मेसेज पसरवणं बंद होईल असा विश्वास कंपनीला आहे. अशा प्रकारचे फीचर स्नॅपचॅट आणि फेसबूकने आपल्या युजर्सला प्रदान केले आहेत. फेसबुकच्या Privacy Shield नावाचं ऑप्शनमध्ये तुम्हाला स्क्रिनशॉटची पूर्णपणे अनुमती देण्यात आलेली नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही मेसेज शेअर करु शकत नाही.