close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'नॅनो' कार पेक्षा छोटी 'क्यूट' कार

 आता टाटा नॅनो पेक्षा लहान कार बाजारात बजाज कंपनी आणत आहे. बजाज कंपनीची 'क्यूट' क्वाड्रीसायकल १८ एप्रिल रोजी देशभरात लॉन्च करण्यात येणार आहे. 

Updated: Apr 17, 2019, 10:48 PM IST
'नॅनो' कार पेक्षा छोटी 'क्यूट' कार

मुंबई : टाटांनी 'नॅनो' कारचे स्वप्न पाहिले आणि त्यांनी छोट्या कुटुंबींयासाठी कार बाजारात आणली. आता टाटा नॅनो पेक्षा लहान कार बाजारात बजाज कंपनी आणत आहे. बजाज कंपनीची 'क्यूट' क्वाड्रीसायकल १८ एप्रिल रोजी देशभरात लॉन्च करण्यात येणार आहे. बजाज 'क्यूट' पेट्रोल आणि सीएनजीमध्ये उपलब्ध असणार आहे. ही देशातली पहिली क्वाड्रीसायकल आहे.

'बजाज क्यूट' कारला २०१२ मध्ये 'ऑटो एक्सपो'मध्ये सादर करण्यात आले होते. त्यावेळी re60 या सांकेतिक नावाने फर्स्ट लूक दाखवण्यात आला. त्यानंतर २०१६ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये बाजारात ही कार लॉन्च करण्यात येणार असल्याचे सादर करण्यात आली.

२०१८ मध्ये रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने 'क्वाड्रीसायकल' गाडीला देशात परवानगी दिली. या गाडीला कायदेशीर मान्यता मिळाल्याने ही कार आता रस्त्यावर धावणार आहे. ही कार व्यावसायिक आणि वैयक्तिक उपयोगासाठी वापरण्यात येऊ शकते.या क्यूट कारची लांबी २७५२ मिमी आणि रुंदी १३१२ मिमी आहे. तर उंची १६५२ मिमी आहे. कारचा वीलबेस १९२५ मिमी आहे. 'क्यूट'चे टर्निंग रेडियस ३.५ मीटर आहे.