अर्रर्रर्र खतरनाक! नाकातून टाकून थेट तोंडातून साप बाहेर, व्हीडिओ पाहिलात?

हा व्हीडिओ पाहून चक्रावून जाल.

Updated: Jul 2, 2021, 09:24 PM IST
अर्रर्रर्र खतरनाक! नाकातून टाकून थेट तोंडातून साप बाहेर, व्हीडिओ पाहिलात?  title=
मुंबई : साप (Snake) पाहताच भल्या भल्यांची पाचावर धारण बसते. साप पाहताच क्षणी अनेक जण घाबरुन जातात. लोकवस्तीत साप शिरल्यावर त्याला रेस्क्यू करण्यासाठी सर्पमित्राला बोलावलं जातं. पण सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, अन काय व्हायरल होईल, याचा काही पत्ता नाही. सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत एक वयस्कर व्यक्ती साप नाकातून टाकून चक्क तोंडातून बाहेर काढताना दिसतोय. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) हा व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. (Bollywood actor Vidyut Jamwal shared a video of a man putting a snake in his nose) 
 
व्हीडिओत दिसणारी व्यक्ती गारुडी किंवा भिक्षुक असल्याचं प्रथमदर्शनी वाटतं. पण याबद्दल नक्की माहिती नाही. जामवालने शेअर केलेला व्हीडिओ अवघ्या काही सेकंदाचा आहे. 
 
 
काय आहे व्हीडिओत?
ही व्यस्क व्यक्ती या सापाला उजव्या नाकपुडीतून आत घालते. या दरम्यान साप  हालचाल करताना दिसून येतो. ही व्यक्ती सापाला नाकपुडीतून तोंडावाटे बाहेर काढते. हा व्हीडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा उभा राहिला. पण या व्यक्तीने अगदी सराईतपणे या सापाला तोंडावाटे बाहेर काढले. या व्हीडिओला नेटीझन्सने मोठ्या प्रमाणावर पसंती  दिली आहे. पण सापांसोबत दुरव्यवहार केला जातोय, त्यामुळे सापला मुक्त करुन या व्यक्तीला ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणीही काही नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.