BSNLचा धमाकेदार प्लान; रोज मिळणार 1.8 GB डेटा

कंपनीने आपल्या  ६ पैसे कॅशबॅक ऑफरची वैधता ३१ मे पर्यंत वाढवली आहे.  

Updated: May 20, 2020, 09:06 PM IST
BSNLचा धमाकेदार प्लान; रोज मिळणार 1.8 GB डेटा

मुंबई : देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन ऑफर्स बाजारात आणत आहेत. बीएसएनएल (BSNL) कंपनीने  आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लानची घोषणा केली आहे. कंपनीने आपला नवीन कॉम्बो 18 प्लान आणखी एका सर्कलमधील ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. हा रिचार्ज फक्त १८ रूपयांचा असणार आहे. या प्लानची वैधता २ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये फ्री कॉलिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. 

BSNLचा हा प्लान आंध्र प्रदेश, तेलंगानासोबत आसाम, मणिपूर आणि नागालँडमध्ये उपलब्ध नाही. BSNLच्या या प्लानमध्ये ग्राहकांना रोज 1.8 हाय स्पीड डेटा मिळणार आहे.  दिवसभर डेटा लिमिट संपल्यानंतर याची स्पीड ८० केबीपीएस पर्यंत जाते. शिवाय तुम्ही या प्लानच्या माध्यमातून २५० मिनिट फ्री कॉलिंगची सुविधा उपभोगू शकता. 

BSNLचा प्लान सध्या छत्तीसगड, चंदीगड, चेन्नई, दिव आणि दमण, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, पूर्वी आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्येही सुद्धा हा प्लान उपलब्ध आहे.

शिवाय कंपनीने आपल्या  ६ पैसे कॅशबॅक ऑफरची वैधता ३१ मे पर्यंत वाढवली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना ६ पैसे कॅशबॅक ऑफर  मिळत आहे. ५ मिनिटांपेक्षा जास्त लँडलाइन कॉल करणाऱ्या ग्राहकाला ही ऑफर मिळत आहे. 

६ पैशे कॅशबॅक ऑफर ऍक्टिवेट करण्यासाठी 'ACT 6 paisa' लिहून 9478053334 वर पाठवावे लागेल.  ही सेवा फक्त वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द होम सब्सक्रायबर्स युजर्संसाठी आहे.