मुंबई : टेलीकॉम कंपनींमध्ये सध्या चांगलीच स्पर्धा रंगली आहे. सर्वच कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे. BSNL ने 75 रुपयांच्या रिचार्ज पॅक लॉन्च केला आहे. बीएसएनएलच्या 75 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉल्स, 10 जीबी डेटा आणि 500 एसएमएस मिळणार आहेत. या नव्या BSNL रिचार्ज पॅकची वॅलिडिटी 15 दिवस असणार आहे. या रिचार्ज पॅकची वॅलिडिटी वाढवली देखील जावू शकते. फक्त 15 दिवसानंतर त्यांना 98 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचं रिचार्ज करावं लागेल. या रिचार्जनंतर आणखी 180 दिवसांची वैधता वाढवून मिळणार आहे.
75 रुपयांच्या बीएसएनएल रिचार्ज पॅकला Reliance Jio च्या 98 रुपयांच्या रिचार्जला आव्हान देण्यासाठी हा पॅक लॉन्च करण्यात आला आहे. जिओ पॅकमध्ये 2 जीबी 4जी डेटा आणि 300 एसएमएससह 28 दिवस अनलिमिटेड वॉईस कॉलिंग सुविधा मिळते.
याआधी बीएसएनएलने 171 रुपयांचा रिचार्ज लॉन्च केला होता. ज्यामध्ये 2 जीबी रोज आणि अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि 100 एसएमएस रोज मिळत होते. या पॅकची वैधता 30 दिवस होती. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार 75 रुपयांचा हा पॅक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 10 जीबी 2जी/3जी डेटा आणि अनलिमिटेड वॉईस कॉलिग आणि 500 एसएमएस 15 दिवसांच्या वॅलिडिटीवर देतो पण मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये फ्री वाईस कॉलिंगची सुविधा नाही मिळत.