बीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन 666 प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 2 जीबी 4 जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता 60 दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण 120 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत. 

Updated: Jun 29, 2017, 01:37 PM IST
बीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर title=

मुंबई : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन 666 प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 2 जीबी 4 जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता 60 दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण 120 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत. 

बीएसएनएलचा नवीन प्लॅन

बीएसएनएलच्या या नवीन प्लानचं नाव आहे बीएसएनएल सिकर 666 प्लॅन. यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. प्रीपेड ग्राहक कोणत्याही नंबरवर अमर्यादित व्हॉइस कॉल करू शकता. शिवाय प्रत्येक दिवशी वापरण्यासाठी 2 जीबी डेटा मिळणार आहे. या पॅकची वैधता 60 दिवस असणार आहे.

दोन नवीन प्रीपेड पॅक लॉन्च

बीएसएनलने गेल्या आठवड्यात दोन नवीन प्रीपेड रिचार्ज पॅक आणले होते. या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना डेटा आणि व्हॉइस कॉल ऑफर मिळणार आहेत. बीएसएनएल सादर केलेल्या कॉम्बो पे 786 आणि 599 रुपयांची ऑफर आणली होती. ही ऑफर 30 जूनपर्यंत तुम्ही घेऊ शकता. याआधी 444 प्लॅन देखील आणला होता ज्यामध्ये ग्राहकांना 360 जीबी डेटा दिला जाणार आहे.