जिओला बीएसएनएलची जोरदार टक्कर, ४९९ चा फीचर फोन लाँच

जिओने सर्वात स्वस्त फोन देत सर्वांना दे धक्का दिला. त्यामुळे अन्य मोबाईल कंपन्यांनी याचा धसका घेतला. मात्र, सरकारी कंपनी बीएसएनएलने जिओलाच जोरदार टक्कर दिलेय.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 30, 2017, 09:07 AM IST
जिओला बीएसएनएलची जोरदार टक्कर, ४९९ चा फीचर फोन लाँच title=

मुंबई : जिओने सर्वात स्वस्त फोन देत सर्वांना दे धक्का दिला. त्यामुळे अन्य मोबाईल कंपन्यांनी याचा धसका घेतला. मात्र, सरकारी कंपनी बीएसएनएलने जिओलाच जोरदार टक्कर दिलेय. बीएसएनएलने केवळ ४९९ रुपयांत फोन आणलाय. हा फोन लाँच केलाय. त्यामुळे ग्राहकांच्या हातात हा फोन लवकरच दिसेल.                                     

बीएसएनएलच्या नव्या फीचर फोनची किंमत फक्त ४९९ रुपये असून ‘डिटेल डी 1’ या कंपनीच्या साथीनं हा नवा फोन लाँच केला आहे. जिओ आणि एअरटेलच्या फोनप्रमाणे या फीचर फोनमध्ये व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. 

या फोनसोबत बीएसएनएलचे सिम मिळणार आहे. पहिले रिचार्ज वर्षभरासाठी वैध असणार आहे. हा प्लॅन १५३ रुपयांचा असणार आहे. पण मोबाइलच्या किंमतीतच या प्लॅनची किंमत समाविष्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या फोनसाठी फक्त ४९९ रुपयेच मोजावे लागतील.

फोनची वैशिष्ट्य -

- बीएसएनएल डिटेल डी १ हा एक बेसिक फोन आहे  
- हा फोन कॉलिंग आणि मेसेज यासाठी तयार करण्यात आलाय
- हा फीचर फोन जिओप्रमाणे डेटा केंद्रीत नाही  
- या फोनमध्ये १.४ इंच स्क्रीन आहे 
- हा फोन सिंगल सिम सपोर्ट आहे 
- या फोनची बॅटरी ६५० एमएएच आहे 
- एफएम रेडिओ, स्पीकर, टॉर्च यासारखे फीचर आहेत