मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामधील सर्वात निर्णय म्हणजे वर्क फ्रॉम होम. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने एक विशेष ब्रॉन्डबँड पॅकेज ग्राहकांच्या सेवेसाठी बाजारत आणला आहे. कंपनीने या नवीन प्लानला Work@Home असं नाव दिलं आहे. BSNLचा हा प्लॉन फक्त लँडलाइन उपभोक्तांसाठी निशुल्क असणार आहे.
जगात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोनासारख्या एका धोकादायक विषाणूमुळे काही देशांमधील जनजीवन फार विस्कळीत झाले आहे. या विषाणूचा संसर्ग आधिक प्रमाणात होवू नये म्हणून सरकारने अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे घरातून काम करण्याचा पर्याय.
यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला इंटरनेटची नितांत गरज भासत. कर्मचाऱ्यांची हिच गरज लक्षात घेत बीएसएनएल आपल्या ग्रहकांना फ्री इंटरनेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी ब्रॉन्डबँड युजर्सला एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही. असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज ५ जीबी डेटा १० Mbpsच्या स्पीडने मिळणार आहे.
वरील डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होवून १ Mbpsराहील. या प्लॉनला आपण Unimitedप्लॉन देखील म्हणू शकतो. या विषेश प्लॉनमध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे इंस्टॉलेशन चार्ज (Installation Charge) किंवा Monthly Charge देण्याची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे या प्लानमध्ये कॉलिंगची सेवा उपलब्ध नाही.