मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग (IPL)च्या मुहूर्तावर रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे. बीएसएनएलने आयपीएल सीजनसाटी २५८ रुपयांमध्ये १५३ GB डेटा सादर केला आहे. याची व्हॅलिडीटी ५१ दिवसांची आहे. बीएसएनएल आयपीएल पॅक अनलिमिटेड टेडा एसटीवी-२४८ सादर करत आहे. यात प्रिपेड ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळेल. (दररोज ३ GB )
बीएसएनएलतर्फे ग्राहक अत्यंत स्वस्त दरात आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग करता येईल. यापूर्वी रिलायन्स जिओने क्रिकेट सीजनसाठी २५१ रुपयांमध्ये १०२ GB डेटा पॅक देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर भारती एअरटेलनेही सांगितले होते की, टी.व्ही. वर हॉटस्टारच्या माध्यमातून आयपीएल मॅचेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग निःशुल्क उपलब्ध होईल.
कोणत्याही स्मार्टफोनवरु गेम खेळू शकाल
इंडियन प्रिमीयर लीगचा माहोल आता सुरु होईल. हेच लक्षात घेऊन जिओने नव्या लाईव्ह मोबाईल गेम व क्रिकेट कॉमेडी शो ची घोषणा केली. कंपनीने सांगितले की, लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले अलॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येईल. याच्याअंतर्गत ११ भाषांमध्ये ७ आठवड्यात ६० मॅच होतील. या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम देण्यात येईल.
कंपनीचा क्रिकेट कॉमेडी शो जिओ धन धना धन लाईव्ह मायजिओ अॅपवर दाखवण्यात येईल. हा शो जिओ आणि अन्य ग्राहकांसाठी फ्री असेल. याची सुरूवात ७ एप्रिल संध्याकाळी ७:३० वाजता होईल. या शोचे होस्टींग सुनील ग्रोवर आणि समीर कोचर करतील. यात अनेक दिग्गज सहभागी होतील.