पाण्यात बुडालेल्या किंवा खराब झालेल्या कारवर Insurance Claim करता येतो का? यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत?

जास्त पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबते आणि त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार पाण्यावर तरंगू लागतात आणि त्यात पाणी शिरते ज्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Updated: Sep 13, 2021, 06:08 PM IST
पाण्यात बुडालेल्या किंवा खराब झालेल्या कारवर Insurance Claim करता येतो का? यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत? title=

मुंबई : सध्या राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे, काही भागात तर पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. ज्यामुळे तुम्ही वर्तमानपत्र किंवा टीव्हीवर पाहिलं असेल की, जागोजागी पाणी देखील भरत आहे. एवढच काय तर तुम्ही देखील हा अनुभव घेतला असणार की, जास्त पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबते आणि त्यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कार पाण्यावर तरंगू लागतात आणि त्यात पाणी शिरते ज्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

ज्यामुळे बर्याचदा लोकांच्या मनात एक प्रश्न उपस्थीत होतो की, अशा परिस्थितीत वाहन खराब झाल्यावर विमा कंपनीकडे त्यासाठी दावा करता येतो की नाही ते?

जर तुमच्याकडे देखील कार असेल आणि तुमच्या मनात हा प्रश्न असेल, तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.

पावसात गाडी खराब झाल्यास क्लेम मिळतो?

Finway FSCचे विमा प्रमुख अमित शर्मा यांनी सांगितले की पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये विमा कंपनीकडून गाड्यांवरती क्लेम दिले जाते. अमित शर्मा म्हणतात, 'मोटार विमा खरेदी करताना, तुम्ही तुमच्या एजंटशी उघडपणे बोलले पाहिजे की, यात काय समाविष्ट केले जाईल आणि काय नाही. या व्यतिरिक्त, आपण अतिरिक्त प्रीमियम भरून आणखी काही गोष्टीही तुमच्या गाडीच्या इंशोरन्समध्ये जोडू शकता.

अटी काय आहेत?

तुमच्या पॉलिसीनुसार क्लेमच्या अटी या वेगवेगळ्या असू शकतात. अमित यांचे म्हणणे आहे की, 'तुमच्या पॉलिसीमध्ये जे काही कंडिशन कव्हर केले आहे, ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे,'

त्याचबरोबर अमित यांनी माहिती दिली की, कार पाण्यात असताना तुम्ही वाहन सुरू करू नये, म्हणजेच इंजिन बंद ठेवले पाहिजे. जर इंजिनमध्ये पाणी गेले असेल, तर कार चालवू नका. अशावेळी वाहनाला टो करा. या व्यतिरिक्त, वेळ मर्यादेची विशेष काळजी घ्या.म्हणजेच वेळ न घालवता लगेच क्लेम करा.

यासह, त्या परिस्थितीचे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे देखील आवश्यक आहे. याशिवाय, विमा कंपनीने मागितलेली कागदपत्रे तयार करा, त्यानंतर तुमचा दावा अनेक अटींच्या आधारे पास केला जातो.

क्लेम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विम्याची आवश्यकता आहे?

Money9 मधील एका अहवालानुसार, तुम्ही तुमच्या कारचा कॉम्प्रिहेंसिव विमा उतरवला असेल, तरच तुम्ही अशा परिस्थितीत विम्यासाठी दावा करू शकता. कॉम्प्रिहेंसिव विम्यामध्ये, पावसाळ्यात झाडे पडणे, दरड कोसळणे यामुळे वाहनाला झालेल्या नुकसानीसाठी तुम्ही कंपनीकडे क्लेम करू शकता. 

हे लक्षात ठेवा की, नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई केवळ कॉम्प्रिहेंसिव पॉलिसीमध्ये केली जाऊ शकते आणि थर्ड पार्टी विम्याच्या बाबतीत असा क्लेम तुम्हाला कंपनीकडून मिळत नाही.

थर्ड पार्टी विमा फायदेशीर नाही?

आता प्रत्येक वाहनासाठी विमा अनिवार्य करण्यात आला आहे आणि थर्ड पार्टी पक्ष विमा देखील यामध्ये वैध आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतात. परंतु, जर तुम्ही कुठेतरी बाहेर जात असाल जेथे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त असेल, तर तुम्हाला कॉम्प्रिहेंसिव कव्हरेज असणे आवश्यक आहे, म्हणून या विमा नियमांची विशेष काळजी घ्या. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तुम्ही दावा करू शकत नाही.