रोज 3 GB डेटासोबत मिळणार खूप सारे फायदे, हा jio चा सिक्रेट प्लॅन माहिती आहे का?

Jio चे कोणते 3 प्लॅन आहेत ज्याचा फायदा तुम्ही कसा होणार वाचा सविस्तर

Updated: Sep 12, 2021, 06:14 PM IST
रोज 3 GB डेटासोबत मिळणार खूप सारे फायदे, हा jio चा सिक्रेट प्लॅन माहिती आहे का?

मुंबई: दीड किंवा दोन जिबी डेटाही आपल्याला आता अपुरा पडू लागला आहे. बऱ्याच कामांमुळे असो किंवा ऑनलाइन क्लास किंवा टाइमपास असो आपल्या फोनला डेटा असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता जास्त डेटा प्लॅन ग्राहकांना मिळावा यासाठी जिओने काही प्लॅन आणले आहेत. हे प्लॅन जर तुम्हाला माहिती नसतील किंवा तुम्ही वापरून पाहिले नसतील तर नक्की पाहायला हवेत. 

या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 3 GB डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि जिओचे अॅप वापरायला मिळणार आहेत. 349 रुपयांचा जिओचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉल आणि 100 SMS मिळणार आहेत. याशिवाय Jio apps सब्स्क्रिप्शन फ्री देण्यात आलं आहे. 

499 रुपयांचा अजून एक बेस्ट प्लान आहे. यामध्ये डिझनी आणि हॉटस्टार सब्स्क्रिप्शन फ्री देण्यात आलं आहे. यामध्ये 3 GB डेटा आणि 100 SMS देण्यात आले आहेत. याची वैधता 28 दिवस देण्यात आली आहे.   Jio TV, JioSaavn सारख्या अॅपचं सब्स्क्रिप्शन या सगळ्या प्लॅनसोबत मिळणार आहे.

जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये सुद्धा युजर्सना दररोज 3GB डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS देखील दिले जातात. बाकीचे फायदे 349 रुपयांच्या प्लॅन सारखेच आहेत. जिओचा 3,499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन मोठा आहे आहे. यामध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. या प्लानची वैधता 365 दिवसांची आहे.