Cheapest 7 Seater Car in India: स्वस्तात मस्त Family Car! 7 लाखांहूनही कमी किंमतीत मिळतेय ही 7 Seater कार

Cheapest 7 Seater Car In India: तुमचं बजेट अगदी 7 लाखांहूनही कमी असेल आणि तुम्ही एका जॉइण्ट फॅमेलीसाठी कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही कार अगदी उत्तम पर्याय ठरु शकते.

Updated: Mar 13, 2023, 08:03 PM IST
Cheapest 7 Seater Car in India: स्वस्तात मस्त Family Car! 7 लाखांहूनही कमी किंमतीत मिळतेय ही 7 Seater कार title=
7 seater car

Cheapest 7 Seater Car: स्वस्तात मस्त सेव्हन सीटर कारचा तुम्ही शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरु शकते. म्हणजे तुमचं बजेट लिमिटेड आहे आणि तुम्ही मोठ्या कुटुंबासाठी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तुमचं बजेट अगदी 7 लाखांहूनही कमी असेल तर तुम्हाला आधी एन्ट्री लेव्हल हॅचबॅक कारचा पर्याय पहावा लागेल असं वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज ठरु शकतो. कारण 7 लाखांहून कमी किंमतीत एक एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) तुम्ही खरेदी करु शकता. अगदी 7 सदस्य असलेलं मोठं कुटुंबही या परवडणाऱ्या कारमधून प्रवास करु शकतं. 

सामान्यपणे एसयूव्ही किंवा एमपीव्ही घेण्याचा विचार केला तर किमान 10 लाख रुपये तरी खिशात हवेत. मात्र आता बाजारात असा पर्याय उपलब्ध आहे की 7 लाखांच्या आतमध्ये येणाऱ्या या गाडीत संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवास करु शकेल. खरं तर ही गाडी म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त एमपीव्ही आहे. या गाडीसमोर अनेक मोठ्या मोठ्या एसयुव्ही फिक्या पडतात असं चित्र दिसत आहे. ज्या एमपीव्हीबद्दल आपण एवढा वेळ बोलत आहोत तिचं नाव आहे रेनॉल्ट ट्रीबर (Renault Triber) याच सर्वात स्वस्त एमपीव्हीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

ही गाडी कोणती?

रेनॉल्ट ट्रीबर (Renault Triber) ही गाडी पहिल्यांदा 2019 साली भारतामध्ये लॉन्च करण्यात आली. त्यानंतर जवळजवळ दरवर्षी या गाडीचं अपग्रेडेट व्हर्जन कंपनी बाजारात आणते. नुकतेच या गाडीचे 2023 चं व्हर्जन बाजारात दाखल झालं आहे. ही कार भारतात लॉन्च झाल्यापासूनच सर्वात परवडणारी आणि सर्वात मोठी कार म्हणून प्रसिद्ध आहे. या किंमतीमध्ये गाडीमध्ये देण्यात आलेले फिचर्स भारतीयांना फारच पसंत पडले आहेत. अगदी शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत सगळीकडेच या गाडीचा चांगली मागणी आहे. या गाडीचं वैशिष्ट्यं काय आहे आपण जाणून घेणार आहोतच पण ही गाडी एका मोठ्या कुटुंबासाठी अगदी योग्य पर्याय आहे हे मात्र खरं.

इंजिन आणि पॉवर

ही गाडी फाइव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या पेट्रोल इंजिनसहीत उपलब्ध आहे. हे इंजिन 6250 आरपीएम आणि 72 पीएसची पॉवर जनरेट करतं. तर 3500 आरपीएमवर 96 न्यूटन मीटरचं पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता या इंजिनमध्ये आहे. या गाडीचे टायर्स हे 165x80 आकाराचे आहेत. या मोठ्या टायर्समुळेच गाडी चांगलं मायलेज देते.

फिचर्स काय?

रेनॉल्ट ट्रीबर ही एमपीव्ही सेफ्टीसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत. जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा या गाडीमध्ये आहे. या गाडीला अडल्ट सेफ्टीसाठी 5 पैकी 4 स्टार मिळाले आहेत. तर चाइल्ड सेफ्टीसाठी 3 स्टारची ग्लोबल एनकॅप रेटिंग मिळाली आहे. एमपीव्हीमध्ये स्टेअरिंग माऊंटेड कंट्रोलबरोबरच 21 सेंटीमीटरची टचस्क्रीन डिस्प्ले आहे. या गाडीबरोबर स्मार्ट अॅक्सेस कार्डही दिलं जात आहे.

किंमत किती?

या गाडीची किंमत किती आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही गाडी केवळ 6.33 लाख रुपयांना (एक्स-शोरुम प्राइज) उपलब्ध आहे.