Disadvantages of Mobile Back Cover: आपल्यापैकी अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन (Smartphone) म्हणजे जीव की प्राण आहे. अगदी ऑनलाइन व्यवहारांपासून ते फोटो काढण्यापर्यंत आणि सोशल मीडियापासून ते ओटीटीपर्यंत अनेक गोष्टींसाठी स्मार्टफोनच आधार असतो. त्यामुळेच अनेकजण आपल्या स्मार्टफोनची अगदी विशेष काळजी घेताना दिसतात. स्क्रीनबरोबरच हल्ली बॅक पॅनलवर स्क्रॅच पडू नयेत म्हणून स्क्रीनगार्डबरोबरच बॅक कव्हरही (Mobile Back Cover) लावलं जातं. फोनला फिजिकल डॅमेज होऊ नये म्हणून अनेकजण बॅक कव्हरचा पर्याय निवडतात. वेगवेगळ्या रंगाचे आणि आकारांचे अगदी स्टायलिस्ट बॅक कव्हर सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
अर्थात बॅक कव्हरचा फायदा असतो. अचानक फोन पडला तर त्याचा थेट फटका फोनच्या बॉडीला न बसता कव्हरला बसतो. तसं आपल्यापैकी अनेकांना या बॅक कव्हरचे फायदे ठाऊक आहेत. ते ठाऊक असल्यानेच बरेच जण हे कव्हर वापरतात. मात्र या कव्हरच्या फायद्यांपेक्षा त्याचे तोटो अधिक आहेत असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. खरोखरच फोनला बॅक कव्हर लावणं हे फायद्यापेक्षा अधिक तोट्याचं असतं. बॅक कव्हरचा फोनच्या लाइफवर आणि युटीलिटीवर म्हणजेच वापरावर मोठा परिणाम होतो. हे तोटे नेमके कोणते हे आपण जाणून घेऊयात...
1) बॅक कव्हर असलेले फोन हे कव्हर नसलेल्या फोनच्या तुलनेत अधिक वेगाने गरम होतात. या फोन्सचं बॅक पॅनेल अनेकदा अल्पवाधित तापल्याचं कव्हर वापरणाऱ्यांनी अनुभवलं असेल.
2) फोन वारंवार गरम झाल्याने तो हँग होऊ लागतो. स्क्रीन रिस्पॉन्स न करणं, फोन रिसिव्ह न करता येणं, अचानक अॅप्लिकेशन बंद होणं यासारख्या अडचणी फोन हँग होण्यास सुरुवात झाली की जाणवू लागतात.
3) अनेक अहवालांमध्ये फोनला बॅक कव्हर लावल्याने तो थंड होण्यास अडथळे येतात असं म्हटलं आहे. फोन गरम झाल्याने तो वेगाने चार्जही होत नाही.
4) चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन कव्हर नसतील तर त्याचाही फोनवर परिणाम होतो. अगदी धूळ जमण्यापासून ते बॅक्टेरियापर्यंत अनेक पद्धतीने हा कव्हर फोन अस्वच्छतेला आमंत्रण देतो.
5) कव्हरमुळे फोनमधील हीट बाहेर पडू शकत नाही आणि तो तापतो. त्यामुळे त्याच्या बॅठरीवरही परिणाम होतो.
6) फोन कव्हरला मॅग्नेटिक पॉपअप असेल तर त्याचा परिणाम फोनमधील जीपीएस आणि कम्पासवर होतो.
आता कव्हरचे दुष्परिणाम पाहिले तरी फोनची सुरक्षा पाहता अगदी कव्हर वापरुच नये असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यामुळेच फोन चार्ज करताना त्याचं कव्हर काढून ठेवणं हा एक सर्वात सोपा आणि उत्त मार्ग आहे. तसेच गेम खेळतानाही फोनचं कव्हर काढून ठेवल्यास तो जास्त तापत नाही. त्याचप्रमाणे जास्त वेळ व्हिडीओ शुटींग करणार असाल, एखादा चित्रपट घरीच मोबाईलवर पाहत असाल तर फोनचं कव्हर काढून ठेवणं फायद्याचं ठरतं. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळेस फोनवर अधिक ताण येईल असं वाटतं त्यावेळेस तो अल्पावधित तापणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्याचं कव्हर काढून ठेवावं.