iPhone घ्यायचा विचार करताय, अमेझॉनवर खास सूट

१३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत हा सेल असणार आहे.

Updated: Nov 16, 2019, 07:10 PM IST
iPhone घ्यायचा विचार करताय, अमेझॉनवर खास सूट

मुंबई : अमेझॉनवर नेहमीच सेल सुरू असतात. आता चक्क IPhone च्या काही प्रॉडक्टवर अमेझॉन सूट घेऊन आला आहे. १३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत हा सेल असणार आहे. IPhone XR आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर AirPods Pro देखील विक्री करता उपलब्ध आहे. शिवाय MacBook Air आणि घड्याळांवर देखील ऑफर आहे. 

iPhone XR आता ४२ हजार ९०० रूपयात मिळत आहे. गेल्यावर्षी हा फोन ७६ हजार ९०० किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तर iPhone 11 अमेझॉनवर ६४ हजार ९०० रूपयात उपलब्ध आहे. 

iPhone 11 वर कोणत्याही प्रकारची सूट नाही, पण iPhone 11 खरेदी करू इच्छुकांसाठी एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट ईएमआय व्यवहारांवर ६ हजार रुपयांची तत्काळ सवलत मिळणार आहे.   

तर, MacBook वर अॅपल देखील ऑफर देण्यात आली आहे. ज्याची किंमत ९४ हजार ९९० रूपयांनी सुरू होत आहे. सोबतच iPhone Air, Ipad 10.2, Ipad pro वर देखील ऑफर सुरू आहे.