आधीच 6 लाखांहून कमी किंमत त्यात 55 हजारांची सूट; 4 Wheeler चे मालक होण्याची हीच योग्य संधी

Festive Seasone Offers: देशात सण-समारंभ सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येतात. या फेस्टिव्ह सिझनला घरी कार आणण्याचा विचार कराताय तर ही बातमी वाचाच. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 8, 2023, 11:50 AM IST
 आधीच 6 लाखांहून कमी किंमत त्यात 55 हजारांची सूट; 4 Wheeler चे मालक होण्याची हीच योग्य संधी title=
Discount on Best Hatchback In India maruti suzuki swift know on road price

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाइल कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. मारुती सुझुकीने सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असलेली कार आणली आहे. तसंच, यावर डिस्काउंटदेखील देण्यात आले आहे. मारुती सुझुकीच्या कार या देशात विक्री होणाऱ्या सर्वाधिक कारमधील एक आहेत. मारुती सुझुकीच्या कार या 15 वर्षांपासून अधिक काळापासून ग्राहकांच्या सेवेत आहेत. कारच्या लुक्स, फिचर,परफॉर्मन्सव्यतिरिक्त कारमधील स्पेसदेखील उत्तम देण्यात आला आहे. परफेक्ट फॅमिली कारम्हणून लोक खरेदी करतात. आता या फेस्टिव्ह सीजनमध्ये कंपनीने धमाकेदार ऑफर लाँच केली आहे. 

मारुती सुझुकीची स्विफ्ट या कारची देशात सर्वाधिक विक्री होते. स्विफ्टवर कंपनीने भरघोस सूट दिली आहे. डिस्काउंट कॅश, एक्सजेंच बोनस आणि कॉर्पोरेट स्कीमदेण्यात येत आहे. कार खरेदी केल्यास ग्राहकांना तब्बल 55 हजारांची सूट देण्यात येत आहे. स्विफ्टच्या एलएक्सआय आणि वीएक्सआय व्हेरियंटवर कंपनी 35 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 20 हजारांचे कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे. तर, कारच्या जेडएक्सआय आणि जेडएक्सआय प्लस व्हेरियंटवर 25 हजारांपर्यंतचे कॅश डिस्काउंट आणि 20 हजारांचा एक्सचेंज बोनस मिळतोय. त्याचबरोबर कॉर्पोरेट डिस्काउंट म्हणून कंपनी 5 हजारांची सूट देणार आहे. कंपनी कारच्या सीएनजी व्हेरियंटवरदेखील डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. स्विफ्ट सीएनजीवर कंपनी 25 हजार रुपयांचे कॅश डिस्काउंट देत आहे. 

लेटेस्ट टेक्नोलॉजी

स्विफ्टच्या कारमध्ये कंपनी 1.2 लीटरच्या के सीरीज 4 सिलेंडर इंजन देण्यात आले आहेत. या इंजिनमध्ये 84 बीएचपीची पॉवर आणि 113 एनएमचे टॉर्क जनरेट करते. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास पेट्रोलवर 22 ते 25 किलोमीटर प्रति लीटर आणि सीएनजीवर 32 किलोमीटर प्रती किलोमीटर पर्यंत मायवेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये कंपनीने ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे. 

फिचर्स

स्वीफ्टमध्ये अनेक कमाल फिचर्स कंपनीने दिले आहेत. कारमध्ये 2 एअरबॅग देण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त एबीएस, ईबीडी, फ्रेंट डिस्क ब्रेक, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड लॉक, आइसोफिक्स सीट्ससारखे सेफ्टी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. तर, इन्फोटेनमेंट सिस्टिम, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल, रिअर पार्किंग सेंसर, क्लाइमेट कंट्रोल एसीसारखे फिचर्स कारमध्ये देण्यात आले आहेत. 

कारची किंमत कधी 

कारच्या किंमतबाबत बोलायचे झाल्यास बेस व्हेरियंटची किंमत 5.99 लाख रुपये एक्स शोरुम किंमत आहे. तर, यातील टॉप व्हेरियंटची किंमत 9.03 लाख रुपये एक्स शोरुम असून स्विफ्टच्या सीएनजी व्हेरियंटची किंमत 7.85 लाख रुपये एक्स शोरुम आहे.