31 डिसेंबर अगोदर गाडी खरेदीवर 1 लाखांची सूट

या गाड्यांचा समावेश 

31 डिसेंबर अगोदर गाडी खरेदीवर 1 लाखांची सूट  title=

मुंबई : कार खरेदी करण्याची उत्तम संधी वर्षाअखेरीस आली आहे. कारण ऑटोमोबाइल कंपन्या आता 1 लाखांपर्यंत सूट देत आहेत. जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला मोठा फटका बसू शकेल. 

टाटा मोटर, फोर्ड इंडिया, मारूती सुझुकी, होंडा, टोयोटा किर्लोस्कर, बीएमडब्लू, रेनो आणि इसुजु या कंपन्या पुढच्या महिन्यात गाड्यांच्या किंमती वाढवणार आहेत. 

पुढच्यावर्षी या कारची किंमत जवळपास 40 हजारांनी वाढणार आहे. 1 जानेवारी 2019 च्या अगोदर कार खरेदी करणं अधिक फायदेशीर असणार आहे. 

प्रत्येक कंपनी आपला स्टॉक क्लिअर करण्यासाठी डिसेंबर महिन्यात वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत असतात. या कार खरेदी करणे अधिक फायदेशीर असतात.

Toyota Yaris 

या कारची किंमत ही 9.29 लाख रुपये ते 14.07 लाख रुपयांपर्यंत आहे. आता या कारवर जवळपास 1 लाख रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच एक्सचेंज ऑफर आणि एक्सेसरीज देखील मिळणार आहे. 

टोयोटा यारिस आपल्या सेगमेंटमधील अशी कार आहे ज्याच्या अगदी सुरूवातीच्या वेरिएंटपासून ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शन मिळत आहे. हे ऑप्शन फक्त पेट्रोल इंजिनसोबत देण्यात आलं आहे. 

Skoda Rapid 

स्कोडा रॅपिडची किंमत 7.99 लाख रुपये ते 13.97 लाख रुपयांपर्यंत आहे. आता या कारवर देखील 1 लाख रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये 50 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 50 हजार रुपयांची लॉयल्टी बोनल मिळणार आहे. 

Skoda Rapid ची गाडी खरेदी केल्यावर 'बाय नाव अॅण्ड पे इन 2020' अशी स्कीम देण्यात आली आहे. या स्कीमच्या अंतर्गत EMI2020 पासून सुरू होणार आहे. 

Hyundai Elantra 

ह्युंडाई एलांट्राची किंमत 13.71 लाख रुपये ते 19.94 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारच्या खरेदीवर 30 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. यासोबतच या खरेदीवर 3 वर्षांचा थर्ड पार्टी इंश्युरन्स मोफत मिळणार आहे. 

Toyota Corolla Altis 

टोयोटा कोरोला अल्टिसची किंमत 16.27 लाख रुपये ते 20.01 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारवर देखील 1 लाख रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात येत आहे. पुढच्यावर्षी नवी जेनरेशन कोरोला लाँच होणार आहे. 

Hyundai Xcent 

ह्युंडाई एक्सेंटची किंमत 5.63 लाख रुपये ते 8.67 लाख रुपयांपर्यंत आहे. डिसेंबरमध्ये ह्युंडाई एस (पेट्रोल) वेरिएंटवर 96 हजार रुपयांच कॅश डिस्काऊंट देत आहे. दुसऱ्या वेरिएंटवर 90 हजार रुपयांचा लाभ होणार आहे. तसेच सगळ्या वेरिएंट्सवर 3 साल/1 लाख किमी ची वॅरंटी आणि फ्री रोड साइड असिस्टेंस देखील मिळणार आहे. 

Honda Amaze 

होंडा अमेझची किंमत 5.80 लाख रुपये ते 9.10 लाख रुपयांपर्यंत आहे. ऑफरच्या अंतर्गत होंडाच्या या कारवर 2 वर्ष अनलिमिटेड किमीची एक्स्ट्रा वॅरंटी आणि तीन वर्षांच मेंटेनेस पॅकेज मोफत दिलं जाणार आहे. 

 Volkswagen Ameo

फॉक्सवॅगन एमिओची किंमत 5.65 लाख रुपये ते 9.99 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारवर 90 हजार डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 30 हजार रुपयांच कॉर्पोरेट बोनस आणि 10 हजार रुपयांची लॉयल्टी बोनस मिळणार आहे. एमियोच्या ऑटोमॅटिक वेरिएंटवर 1.5 लाख रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळणार आहे. 

Tata Zest 

टाटा झेस्टवर 20 हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काऊंट आणि 45 हजार रुपयांचा कंझ्युमर डिस्काऊंट दिला जाणार आहे. जेस्टच्या प्रीमिओ वर्जनवर 60 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. 

Volkswagen Vento

फोक्सवॅगन वेंटोची किंमत 8.38 लाख रुपये ते 14.02 लाख रुपयांची आहे. वेंटोवर 90 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट आहे. यामध्ये 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 30 हजार रुपयांचा कार्पोरेट बोनस तर 10 हजार रुपयांवर रॉयल्टी बोनसचा सहभाग आहे.