हिरो, टीव्हीएस, होंडा, महिंद्राच्या स्कूटरवर बंपर ऑफर्स

देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. लोक एकापेक्षा एक बाईक्स, स्कूटर्स, कार्सची खरेदी करत आहेत. दिवाळीत या बाईक, स्कूटर्स दमदार ऑफर्स दिल्या जातात. विक्रीच्या बाबतीत स्कूटर्सची बाईकच्या क्रेझपेक्षा अधिक बघायला मिळते. त्यामुळे कंपन्या स्कूटर्सवर अनेक प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. जाणून घेऊया काय आहेत ऑफर्स....

Updated: Oct 19, 2017, 03:17 PM IST
हिरो, टीव्हीएस, होंडा, महिंद्राच्या स्कूटरवर बंपर ऑफर्स title=

नवी दिल्ली : देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. लोक एकापेक्षा एक बाईक्स, स्कूटर्स, कार्सची खरेदी करत आहेत. दिवाळीत या बाईक, स्कूटर्स दमदार ऑफर्स दिल्या जातात. विक्रीच्या बाबतीत स्कूटर्सची बाईकच्या क्रेझपेक्षा अधिक बघायला मिळते. त्यामुळे कंपन्या स्कूटर्सवर अनेक प्रकारच्या ऑफर्स देत आहेत. जाणून घेऊया काय आहेत ऑफर्स....

होंडा अ‍ॅक्टिव्हा -

देशातील सर्वात लोकप्रिय स्कूटरवर ऑफर दिली जात आहे. दिवाळीत ही स्कूटर खरेदी केल्यास त्यासाठी तुम्हाला केवळ ५ हजार ९९९ रूपयांचं डाऊनपेमेंट द्यावं लागेल. ही रक्कम दिल्यावर तुम्ही स्कूटर घरी नेऊ शकाल. इतकेच नाही तर डॉक्यूमेंटेशन आणि प्रोसेसिंगची फि सुद्धा शून्य असणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर खरेदी केल्यावर तुमची एकूण ७ हजार ५०० रूपयांची बचत होणार आहे. 

होंडा अ‍ॅव्हिएटर -

होंडाच्या या स्कूटरवर देखील होंडा अ‍ॅक्टिव्हासारखीच ऑफर दिली जात आहे. केवळ ५ हजार ९९९ रूपयांच्या डाऊनपेमेंटवर ही स्कूटर तुम्हाला मिळेल. ही ऑफर उत्सव धमाका च्या माध्यमातून दिली जात आहे. 

टीव्हीएस ज्यूपिटर -

होंडासोबतच टीव्हीएसच्या स्कूटरवरही ऑफर दिली जात आहे. नुकतेच लॉन्च झालेल्या ज्यूपिटरच्या लेटेस्ट व्हर्जन ज्यूपिटर क्लासिकसाठी तुम्हाला ६ हजार ९९९ रूपयांचे डाऊनपेमेंट द्यावे लागेल. इतकेच नाही तर टीव्हीएसकडून स्कूटरच्या खरेदीवर केवळ ३.९९ टक्के व्याज दर ऑफर दिली जात आहे. 

टीव्हीएस वीगो -

TVS WEGO ही स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ ६ हजार ९९९ रूपयांचे डाऊनपेमेंट करावे लागेल. यासोबतच या स्कूटरच्या खरेदीवर ३.९९ टक्के दराने लोन ऑफर दिली जात आहे. ही स्कूटर घेतल्यास तुम्हाला ७ हजार ३०० रूपयांचा फायदा होणार आहे. ही स्कूटर तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

महिंद्रा गस्टो -

महिंद्राने २० सप्टेबर ते २० ऑक्टोबर ऑफर सुरू केली आहे. महिंद्राच्या गस्टो स्कूटरवर तुम्हाला ६ हजार रूपयांची पेटीएम कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.