या ट्रॅक्टर ड्रायव्हरने जे केलं, तसे कधीही करू नका

यूट्यूबवर सध्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरचा व्हिडीओ ट्रेन्ड करतोय.

Updated: Aug 6, 2017, 09:09 PM IST

मुंबई : यूट्यूबवर सध्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरचा व्हिडीओ ट्रेन्ड करतोय, पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात गाड्या वाहून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत, मात्र या ट्रॅक्टर चालकाने खोल पाण्यात ट्रॅक्टर टाकून पलीकडे नेले. 

हे दृश्य व्हिडीओत दिसत असले, तरी ट्रॅक्टर ड्रायव्हरचा पाणी नसताना हा कायमचा रस्ता असू शकतो.

 तसेच ट्रॅक्टरमध्ये कारपेक्षा पॉवर अधिक असते, तसेच या पाण्याला कोणताही प्रवाह नाही, हे चाललेले पाणी असल्याने ड्रायव्हरला असे करता आले, त्यामुळे पाण्यात गाडी किंवा वाहनं टाकू नका, धोका पत्करू नका.