Truecaller बद्दल तुम्हाला 'ही' गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

हे फक्त Trucaller सोबतच घडत नाही, तर तुम्ही कधी पाहिलं असेल की हे मेसेजच्या बाबतीतही घडतं. 

Updated: Feb 26, 2022, 07:01 PM IST
Truecaller बद्दल तुम्हाला 'ही' गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य title=

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या फोनमध्ये  Truecaller आहे. या ऍपमुळे आपल्याला कोणीही  Unknown नंबर वरुन फोन केलं तरी देखील आपल्याला त्या व्यक्तिचे नाव कळते. ज्यामुळे तो फोन उचलायचा की नाही किंवा तो कोणी केला असावा हे कळते. परंतु काहीवेळा Truecaller चा हा अंदाज चुकतो देखील किंवा कधीधी आपल्यासमोर असे नाव येते, जे आपल्यासाठी अनोळखी असते. परंतु असं का होतं? तर बरेच लोक ज्या नावाने त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करतात, ते नाव आपल्याला दिसते. परंतु हे वैशिष्ट्य लोकांसाठी खूप उपयुक्त आहे.

तुम्ही बऱ्याचदा असं देखील पाहिलं असेल की, तुम्हाला कोणाचा फोन येण्यापूर्वी  Truecaller तुम्हाला कळवतो की, तुम्हाला फोनवर कॉल येणार आहे. परंतु असे का घडते आणि Truecaller ला कॉल येणार आहे हे कसे कळतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे. तर आज आम्ही तुम्हाला यामागचे कारण सांगणार आहोत.

हे फक्त Trucaller सोबतच घडत नाही, तर तुम्ही कधी पाहिलं असेल की हे मेसेजच्या बाबतीतही घडतं. अनेक वेळा तुम्हाला ऍप्लिकेशनवर OTP टाकावा लागतो, पण OTP मेसेज येण्यापूर्वी, OTP आपोआप तेथे टाकला जातो. 

म्हणडेच हे लक्षात घ्या की, ही अशी प्रणाली आहे, जेथे मेसेजच्या आधीच ऍप्लिकेशनची माहिती मिळते. Truecaller बाबतीत देखील असेच घडते.

पण असे का घडते?

सेल्युलर नेटवर्कची गती आणि इंटरनेट नेटवर्कची वारंवारता यांच्यातील फरकामुळे असे घडते.  खरेतर प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क एका निश्चित फ्रिक्वेन्सीवर काम करतात. या कंपन्या कॉल करण्यासाठी 450 ते 2700 MHz ची फ्रिक्वेंसी वापरतात.

तेच ऍप्लिकेशन्स हे इंटरनेट फ्रिक्वेन्सीवर काम करतात आणि ही फ्रिक्वेंसी उणे 2 GHz च्या आसपास असते. यावरून हे लक्षात येतं की इंटरनेटचा वेग कॉलपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. यामुळे, फास्ट फ्रिक्वेन्सीमुळे ऍप्लिकेशनला आधीच याबद्दल माहिती मिळते. 

जेव्हा एखादा कॉल येतो, तेव्हा Truecaller रेडिओ फ्रिक्वेन्सीसह कॉल शोधतो आणि कमी सेल्युलर गतीमुळे कॉल खूप वेळाने लावला जातो. यामुळे, ऍप्लिकेशन कॉल काही सेकंद आधी याला ओळखतो आणि आपल्याला नोटीफिकेशन कॉल येण्याआधीच पाठवते.