Ducati Mutistrada 1260 'या' तारखेला होणार लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

...

Updated: Jun 16, 2018, 04:27 PM IST
Ducati Mutistrada 1260 'या' तारखेला होणार लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स title=
Image: www.ducati.com

नवी दिल्ली : Ducati इंडिया आपली नवी मल्टीस्ट्राडा 1260 बाईक लवकरच लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या या नव्या बाईकची लॉन्चिंग तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार १९ जून रोजी Multistrada 1260 लॉन्च करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही बाईक चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारातही हे सर्व व्हेरिएंट्स लॉन्च केले जाऊ शकतात.

Multistrada 1260 बाईकमध्ये मुख्य बदल हा इंजिनचा असणार आहे. या नव्या बाईकमध्ये 1198 cc इंजिन ऐवजी 1262 cc इंजिन देण्यात येणार आहे. 

आधीच लॉन्च करण्यात आलेली Multistrada 1200 बाईकमध्ये 1198 CC इंजिन देण्यात आलं आहे. त्यानंतर आता Multistrada 1260 मध्येही असचं इंजिन असणार आहे. नवं इंजिन खूपच पावरफूल असणार आहे आणि 9500 आरपीएमवर 158 hp पावर जनरेट करेल. यासोबतच 7500 आरपीएमवर 129.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6 स्पीड गेअरबॉक्ससोबत असणार आहे.

स्टाईलचा विचार केला तर दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये बॉडी पॅनल्सचा मेकओव्हर पहायला मिळणार आहे. अलॉय व्हिल्सही रि-डिझाईन करण्यात आले आहेत. या बाईकची टक्कर ट्रायम्फ टायगर 1200 आणि बीएमडब्ल्यू आर 1200 जीएस सोबत होईल. या बाईकची किंमत 17 ते 18 लाख रुपये असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.